सांगली : दुचाकीवरून शाळेला निघालेल्या शिक्षिकेला अडवून चाकूचे वार करीत एक लाख १५ हजाराचे दागिने लुटण्याचा प्रकार कोंगनोळी (ता.कवठेमहांकाळ) येथे मंगळवारी घडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोंगनोळी येथील दीपाली मगर (रा. ढवळे वस्ती) या शिक्षिका अग्रण धुळगाव शाळेत अध्यापनासाठी आपल्या दुचाकीवरून (एमएच १० सीएस ९६६१) निघाल्या होत्या. त्यावेळी समोरून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी त्यांना अडवले. एकाने दुचाकीला पकडून हातावर चाकूने वार करत धमकी देत गळ्यातील गंठण व कर्णफुले, हातातील सोन्याचा मुलामा दिलेल्या बांगड्या असा १ लाख १५ हजाराचा ऐवज काढून घेतला. कर्णफुले देण्यास विरोध केला असता तो चाकूचा धाक दाखवत हिसकावून घेतला.

आणखी वाचा-सातारा: उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अधिकारी व पोलिसांचा सन्मान

या घटनेत महिला जखमी झाली. तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. सायंकाळी उशिरा याबाबत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात चार अज्ञाताविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher was robbed while going to school on a two wheeler mrj