लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सातारा : साताऱ्यातील कोरेगाव मतदार संघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आमदार महेश शिंदे यांच्या वक्तव्यावर टीका करणारा फलक आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी उभारल्याचा राग आल्याने आमदार शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी तो फलक फाडला. यामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

आणखी वाचा-Ramgiri Maharaj : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल

आमदार महेश शिंदे यांनी नुकतेच ‘लाडकी बहीण योजने’ची डिसेंबर महिन्यात तपासणी होणार असून निवडणुकीत मतदान न करणाऱ्या बहिणींची नावे कमी करण्यात येणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून मतदार संघात अंबवडे चौकासह काही ठिकाणी त्यांच्या विरोधात आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी फलक लावले होते. त्यावरील मजुकर न आवडल्याने हे फलक फडण्यात आले. हे महेश शिंदे यांच्या समर्थकांनी फाढल्यामुळे वादाचा प्रसंग तयार होत तणावाची परिस्थिती तयार झाली. यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tension in koregaon constituency due to panel tearing mrj