सातारा: किल्ले सज्जनगड बुरुजाच्या खालील भराव खचला आहे. यामुळे सज्जनगडावरील मोठ-मोठे दगड, मुरूम, झाडे, झुडपे वाहून येणे असे प्रकार घडत आहेत. गडावरील वाहनतळापासून अंगलाईदेवी मंदिराच्या खालील बुरुजापर्यंत रस्ता बनवण्यात आला आहे. या रस्त्याच्या वरील बाजूस असलेल्या डोंगरातील भराव खचत आहे. हा भराव खचून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
किल्ले सज्जनगडावरील वाहनतळापर्यंत रस्ता बनवण्यात आला आहे. सज्जनगड, परळी, कास पठार भागात जोरदार पाऊस सुरू आहे. रस्त्यावरील बाजूच्या डोंगराचा भाग खचून रस्त्यावर आला आहे. त्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ताबडतोब उपाययोजना न केल्यास आणखी काही भागांतील भराव खचण्याची शक्यता आहे.
सज्जनगड परिसरात अतिवृष्टी सुरू असून, रस्त्यावरही झाडे उन्मळून पडणे तसेच मोठ-मोठे दगड वाहून येणे, असे प्रकार घडत आहेत. गडावरील वाहनतळापासून अंगलाईदेवी मंदिराच्या खालील बुरुजापर्यंत रस्ता बनवण्यात आला आहे. या रस्त्याच्या वरील बाजूस असलेल्या डोंगरातील भराव खचत आहे. हा भराव खचून मोठी दुर्घटना होण्याचीही शक्यता आहे. प्रशासनाने यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांकडून होत आहे.