पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात १६ एप्रिल रोजी दोन साधु आणि त्यांच्या वाहनचालकाच्या हत्येप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सुरतकडे आडमार्गाने निघालेल्या या दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची ग्रामस्थांनी चोर समजून अमानुषपणे हत्या केली होती. याप्रकरणी हलगर्जीपणा दाखवल्याबाबत कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसेच उपनिरीक्षकाला त्यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एक सहाय्यक फौजदार व दोन हवालदार यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली.

काल रात्री या पोलीस स्टेशनमधील ३५ कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातील अन्य पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली होती. सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभाग करीत असून सुमारे ४०० ते ५०० आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.