यवतमाळ जिल्ह्यात आज रविवारी एकाच दिवशी नऊ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यात सात पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असून, एक रुग्ण पुसद येथील आणि आठ रुग्ण नेर येथील आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये नेर येथील पुरुष ( वय ५७) आणि महिला (वय ७५) हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. तसेच नेर येथील ४५ वर्षीय महिला आणि २१ वर्षीय युवक हे दोघे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. याशिवाय नेर येथील ५२ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय दोन युवक आणि ३२ वर्षीय एका युवकाचा समावेश आहे. तर उर्वरीत एक पॉझिटिव्ह रुग्ण (वय ५२) हा पुसद येथील आहे.

सध्यास्थितीत विलगीकरण कक्षात ४० जण भरती असून यापैकी ३४ व्यक्ती ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८१ झाली असून यापैकी १४४ जण बरे होवून घरी गेले आहे. तर करोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत एकूण दोन हजार ६९२ नमूने तपासणीसाठी पाठविले असून, सर्व अहवाल प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ५११ जण नेगेटिव्ह आले आहे.

राज्याच्या रेड झोनमधून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब असून बाहेरून आलेल्या लोकांनी स्थानिकांच्या संपर्कात येऊ नये. तसेच स्थानिक लोकांनीसुध्दा आपल्या गावात आलेल्या लोकांबद्दल तत्काळ तालुकास्तरीय समितीला कळवावे. जेणेकरून त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य होईल. नागरिकांनी अनावश्यकपणे बाहेर पडून गर्दी करू नये. या विषाणुच्या संसर्गाची मानवी साखळी तोडण्यासाठी घरातच सुरक्षित राहावे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today nine people found corona positive in yavatmal msr