अहमदनगरमधील शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची हत्या केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना रविवारी पहाटे अटक करण्यात आली. या प्रकरणातील हल्लेखोर संदीप गुंजाळ हा देखील शनिवारी रात्री पोलीस ठाण्यात हजर झाला असून तो काँग्रेसमध्ये सक्रीय होता, असे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिवारी केडगाव उपनगरातील भररस्त्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी सहा ते साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली होती. संजय कोतकर (वय ५५) आणि वसंत ठुबे (वय ४०) अशी या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. संजय कोतकर हे शिवसेनेचे उपशहरप्रमुख होते. केडगावमधील महापालिका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर ही घटना घडल्याने नगरमधील वातावरण तापले.

पोलिसांनी या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह तीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर (वय २५) याने या प्रकरणात फिर्याद दाखल केली आहे. रविवारी पहाटे पोलिसांनी संग्राम जगताप यांना अटक केल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two shiv sena leaders murdered in ahmednagar ncp mla sangram jagtap arrested