छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवनून देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हंबरडा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात उद्धव ठाकरेंनी भाषण केलं आणि सरकारवर जोरदार टीका केली. जर राज्याला विरोधी पक्षनेता नसेल आणि त्यासाठी जर नियम शोधावा लागत असेल तर उपमुख्यमंत्री हे पद संवैधानिक नाही. त्यावर दोन दोन उपमुख्यमंत्री पदावर आहेत? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तसंच पीएम केअर फंडातून १० हजार रुपये प्रत्येक महिलेला द्या अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली.

उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य नेमकं काय?

मोहन भागवत यांनी अखंड भारत म्हणाले ते सोडून द्या हो आधी पाकव्याप्त काश्मीरमध्ये का घुसत नाही ते सांगा. असा सवाल उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षनेता महाराष्ट्रात नेमला जात नाही कारण असा काही नियम नाही, तुमचं संख्याबळ नाही असं सांगत आहेत. मग उपमुख्यमंत्री हे पद तर असंवैधानिक आहे, तुम्ही ते पद कसं काय दोन दोन नेत्यांना दिलं आहे? आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदी मंगळसूत्र म्हणाले पण सध्या स्थिती…

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हंबरडा मोर्चा मराठवाड्यात काढण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषण केलं आणि त्या भाषणात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केले आहे. साखर कारखानदारांनी शेकडो कोटी रुपये लुटून टाकले आहेत. भाजपात गेल्यानंतर थक कर्जही दिलं जातं आहे मग माझ्या शेतकऱ्यांना मदत का करत नाही? मोदी मंगळसूत्र चोरतील म्हणाले होते प्रचारात पण आता स्थिती अशी आहे माझ्या शेतकऱ्याला त्याच्या पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतं आहे त्याचं काय? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

शेतकऱ्यांना पॅकेज मिळालं का? याची माहिती घ्या-उद्धव ठाकरे

आपल्याकडे विरोधी पक्षनेते पद नसलं तरीही सगळ्या शेतकऱ्यांची भेट घ्या. पॅकेज मिळालं का? मदत मिळाली का? पॅकेजची किती मदत मिळाली? सगळं शिवसेना करणार आहे. सगळं शिवसेना करायला तयार आहे मला त्यासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत. मला मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडत नाहीत. मी मुख्यमंत्री झालो असतो तर पंचाग काढून योग्य वेळ बघत बसलो नसतो. मी पहिल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना मदत जाहीर केली असती. आस्मानी संकट आणि सुलतानी संकटं आली आहेत. आस्मानी संकट आपल्या हातात नाही. पण सुलतानी संकटाचा सामना करण्यासाठी शिवसेना तुमच्या बरोबर आहे हे कुणीही विसरु नका असंही उद्धव ठाकरे म्हणाले.