वाई:विविध पक्ष, संघटनांनी आज ‘ईव्हीएम’ मशीनची सातारा शहरातून अंत्ययात्रा काढत केंद्रातील व राज्यातील सरकारचा निषेध नोंदवला व ईव्हीएम’ हटाओचा नारा दिला. राजवाडा येथून ही अंत्ययात्रा सुरू होऊन ती सातारा शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर आली. येथे मोर्चात सहभागी विविध पक्ष, संघटनांनी केंद्र व राज्यातील सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या व आपली मते व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Uddhav Thackeray Sabha: “BJP म्हणजे भेकड जनता पार्टी! आमची सत्ता आल्यावर…”, उद्धव ठाकरेंची टीका

ईव्हीएम’ मशीन बोगस असून ते हॅक होते. कोणतेही बटण दाबले की मत कमळाला जाते, या यंत्राच्या माध्यमातून मोदी सरकार  मागील दहा  वर्षे जनतेच्या मतांची चोरी करीत आहे अशी जोरदार टीका माजी आमदार लक्ष्मण माने यांनी मोदी सरकारवर केली. तसेच आता ‘ईव्हीएम हटाओ व देश बचाओ’चा नारा आम्ही दिला आहे. आगामी निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, अशीही मागणी त्यांनी केली.

या आंदोलनात काँग्रेसचे बाळासाहेब शिरसट, मनोज तपासे, राष्ट्रवादीचे लक्ष्मण माने, आम आदमी पार्टीचे सागर भोगावकर, परिवर्तनवादी संघटनेचे विजय मांडके, वंचित बहुजन आघाडीचे बाळकृष्ण देसाई, ओबीसी संयुक्त संघटनेचे हौसेराव धुमाळ, सलोखा संघटनेचे मिनाज सय्यद, भटक्या-विमुक्त संघटनेचे नारायण जावळीकर आदींसह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा >>> “निवडणुका आल्या की हे महाशय ढसाढसा रडतात”, पंतप्रधानांवर संजय राऊतांची टीका; म्हणाले, “रामाने डोळे वटारून…”

मोदी सरकार हे बोगस सरकार आहे,दहा वर्षे हे सरकार काम करीत आहे. या सरकार व यंत्रावर आमचा विश्वास नाही. दिल्लीच्या जंतरमंतरवर हजारो विधिज्ञ बसले असून ते म्हणतात, की ईव्हीएम मशिन बोगस असून ते हॅक करता येते. त्यामुळे आता बॅलेट पेपरवर मतदान व्हावे, अशी आमची मागणी आहे. जगभर मतदानासाठी बॅलेट पेपरच वापरत आहेत. ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून आमच्या मतांच्या चोऱ्या होत असून यातून कोट्यवधी लोकांची फसवणूक चालू आहे. या चोऱ्या हे मशीन बंद होईल, त्यावेळीच बंद होतील. या मशिनची आम्ही अंत्ययात्रा काढली आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various parties protested against governments by carrying out funeral procession of evm zws
First published on: 23-01-2024 at 20:05 IST