वसई तहसीलदार कार्यालयाचे नायब तहसलीदार प्रदीप मुकणे यांना दोन लाख रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी सोमवारी रात्री ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. मुकणे यांच्या वतीने लाखेची रक्कम स्वीकारणारे मंडल अधिकारी संजय सोनावणे यांना दीड लाख रुपये घेतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. मुकणे यांच्या अटकेने वसईत खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणातील तक्रारदाराने वसई पूर्वेच्या गोखीवरे येथे भूमापन क्रमांक २३३ हिस्सा क्रमांक अ/३ येथे जमीन विकत घेतली होती. या जमिनीचा फेरफार रद्द करण्यासाठी वसईचे नायब तहसीलदार प्रदीप मुकणे (५३) यांनी २ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदार यांनी ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी सापळा लावण्यात आला होता. दुपारी ३ वाजता माणिकपूर विभागाचे मंडल अधिकारी संजय सोनवणे यांना दीड लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर ४ वाजता मुकणे यांना कार्यालातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai nayab tahasildar prqadip mukane arrested in bribe case pmw
First published on: 05-07-2022 at 11:47 IST