अलिबाग – चालत्या कारवर दरड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात घडली आहे. स्नेहल गुजराती असं अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच नाव आहे.
माणगाव तालुक्यातील कोंडेथर गावाजवळ गुरुवारी ही घटना घडली. ही महिला आपल्या कुटुंबासमवेत पुण्याहून माणगावच्या दिशेने येत होती. ताम्हिणी घाटातून जात असताना डोंगरावरून एक भला मोठा दगड त्यांच्या गाडीवर कोसळला. गाडीचा सनरूफ तोडून हा दगड स्नेहल यांच्या डोक्यावर आदळला. ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या. पुन्हा जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी देण्यात आले. मात्र त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी माणगाव पोलीस पुढील तपास करत आहोत.
कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या पावसामुळे लहान मोठ्या दरडी कोसळत असतात. त्यामुळे आंबेनळी घाट, भोर घाट पावसाळ्यात वाहतुकीसाठी नियंत्रित केले जातात. त्या तुलनेत ताम्हिणी घाट हा प्रवासासाठी सुरक्षित मानला जातो. पण या घटनेमुळे या घाटातील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे.
घाटरस्त्यावरील दरडी कोसळण्याच्या घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून जोर धरत आहे.
