X
X

महेश मांजरेकरांच्या मुलीसोबत सलमानने शेअर केला फोटो, हे आहे कारण..

READ IN APP

पदार्पणापूर्वीच सोशल मीडियावर सईची जोरदार चर्चा आहे.

मराठीतील ‘बिग बॉस’ अर्थात अभिनेते महेश मांजरेकर यांची धाकटी मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. पदार्पणापूर्वीच सईची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ‘आयफा’ या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात ती नुकतीच सलमानसोबत झळकली होती. त्यामुळे बॉलिवूडमध्ये सईच्या ग्रँड एण्ट्रीसाठी ‘दबंग’ खानसुद्धा चांगलेच प्रयत्न करताना दिसतोय. सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवर सईसोबतचा एक फोटो पोस्ट केला असून सध्या या फोटोचीच चर्चा आहे.

या फोटोमध्ये एका तलावाकाठी सलमानसोबत सई पाहायला मिळतेय. ज्या ठिकाणी ‘दबंग ३’चे चित्रीकरण सुरु आहे, तिथला हा फोटो आहे. सईनेसुद्धा सलमानचा हा फोटो तिच्या अकाऊंटवर रिपोस्ट केला आहे. ‘दबंग ३’मध्ये सई सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे या दोघांमधील केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील.

‘भाईजान’ सलमान आजवर अनेक अभिनेत्रींसाठी बॉलिवूडचा ‘गॉडफादर’ ठरला आहे. कतरिना कैफ, झरीन खान, डेझी शाह या अभिनेत्रींना त्याने बॉलिवूडमध्ये आणलं आहे. सईच्या निमित्ताने आणखी एक स्टारकिड इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे. अभिनयाच्या बाबतीत ती प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आणखी वाचा: कतरिनाशी अफेअरच्या चर्चांवर अखेर विकीने सोडलं मौन

पदार्पणापूर्वी सईने सोशल मीडियावर तिचा एक चाहतावर्ग निर्माण केला आहे. इन्स्टाग्रामवर सक्रिय असणारी सई तिचे बरेच फोटो, व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांशी जोडून राहण्याचा प्रयत्न करते. गेल्या काही दिवसांत तिच्या फॉलोअर्समध्येही वाढ झाली आहे.

24

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Just Now!
X