X
X

एक फोन कॉल आणि सई झाली ‘दबंग ३’ची हिरोईन

जाणून घ्या, सईला फोन करुन कोणी दिली चित्रपटाची ऑफर

सई मांजरेकर हे नाव आता चाहत्यांसाठी फार काही नवीन राहिलं नाही. ‘दबंग ३’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेली सई चित्रपट प्रदर्शनापूर्वीच लोकप्रिय झाली आहे. महेश मांजरेकर यांची लेक असलेल्या सईचा हा पहिलाच चित्रपट आहे. विशेष म्हणजे तिला सलमान खानसारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळतेय ही तिच्यासाठी जणू पर्वणीच आहे. मात्र या चित्रपटासाठी तिची नेमकी निवड कशी झाली हे अद्यापही कोणाला माहित नाही. परंतु एका मुलाखतीत बोलत असतानाच सईने ‘दबंग ३’ साठी तिची निवड कशी झाली हे सांगितलं.

सलमान खान बऱ्याच वेळा नवनवीन चेहऱ्यांना कलाविश्वात लॉन्च करत असतो. यामध्येच आता त्याने सईला लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने स्वत: सईला फोन करुन चित्रपटाची ऑफर दिल्याचं सईने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

My very first song, so so special #nainalade #dabangg3

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar) on‘दबंग ३’ या चित्रपटात तुझी वर्णी कशी लागली? असा प्रश्न एका मुलाखतीत सईला विचारण्यात आला होता. त्यावर “यापूर्वी मी ‘दबंग’ आणि ‘दबंग २’ चित्रपट पाहिले होते. हे दोन्ही चित्रपट मला प्रचंड आवडले होते. त्यामुळे या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची मी आतुरतेने वाटत होते. त्यातच लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचं मला समजल्यामुळे मी प्रचंड खूश होते. याच दरम्यान, मला सलमान सरांचा फोन आला आणि चित्रपटातील एका भूमिकेसाठी आम्ही तुझा विचार करतोय असं सांगितलं. तसंच  आता तयारीला लाग, स्क्रीनटेस्ट वगैरे होईल. त्यानंतर पुढे या भूमिकेसाठीचा निर्णय घेण्यात येईल, असं सलमान सरांनी मला सांगितलं आणि अखेर हा चित्रपट मला मिळाला”, असं सईने सांगितलं.

दरम्यान, सईचा हा पहिलाच डेब्यु चित्रपट असून त्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने तिला कलाविश्वातील दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. या चित्रपटात प्रभुदेवा, सलमान खान, सोनाक्षी, डिंपल कपाडिया ही कलाकार मंडळी आहेत.

21
Just Now!
X