‘पीके’ या आगामी चित्रपटात साकारलेली भूमिका ही आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा आव्हानात्मक असल्याचे बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमीर खानचे म्हणणे आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर आमीरच्या ‘पीके’ चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना तो म्हणाला, गेल्या २५ वर्षांपासून मी चित्रपटांमधून विविध भूमिका साकारल्या असून, ‘पीके’मधील भूमिका ही माझ्या कारकिर्दीतील सर्वांत आव्हानात्मक भूमिका आहे. संपूर्ण चित्रपटात मी डोळ्यांची उघडझाप केलेली नाही. चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा कशाप्रकारे आकार घेईल यावर आम्ही अनेक वेळा चर्चा केली, परंतु प्रत्येकवेळी काही तरी राहून गेल्याची भावना मनात निर्माण झाल्याचे तो म्हणाला. चित्रपटात आमीर ‘पीके’ची व्यक्तिरेखा साकारत असून, ‘पीके’ला सतत पान खायची सवय आहे. याबाबत शुटिंगदरम्यानची आठवण सांगताना तो म्हणतो, ‘पीके’ पानाचा खूप शौकीन आहे. मलासुद्धा पान खूप आवडते. चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान जवळजवळ मी १०० पान खाल्ली असतील. सेटवर सतत एक पानवाल हजर असे. ‘३ इडियट’ चित्रपटानंतर आमीर आणि राजकुमार हिराणी ‘पीके’च्या निमित्ताने दुसऱ्यांदा एकत्र येत आहेत. हा चित्रपट पूर्ण करायला हिराणींना पाच वर्ष लागली. अनुष्का शर्मा चित्रपटातील मुख्य स्त्री व्यक्तिरेखा साकारत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan pk the most important and difficult role of my career