अभिनेते प्रकाश राज त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते ट्विटरवरून अनेक सामाजिक व राजकीय विषयांबाबत त्यांची मतं मांडत असतात. त्यांनी बंगळुरूमध्ये अधिकृत तक्रार दाखल केली आहे. एका युट्यूब चॅनेलने चिथावणीखोर मजकूर प्रसारित केल्याने त्यांचा जीव आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात आली आहे, असं प्रकाश राज यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“तिच्यामुळे दोन मुलांनी आत्महत्या केल्या,” तनुश्री दत्ताचे राखी सावंतवर गंभीर आरोप; म्हणाली, “इतके धर्म बदलूनही…”

‘फायनॅन्शिल एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, प्रकाश राज यांच्या तक्रारीनंतर बंगळुरूमधील अशोक नगर पोलिसांनी ‘टिव्ही विक्रम’ या यूट्यूब चॅनलविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सनातन धर्माबाबत प्रकाश राज यांनी केलेल्या टिप्पणीनंतर हा प्रकार घडल्याचं कळतंय. या युट्यूब चॅनलच्या वादग्रस्त व्हिडीओला जवळजवळ ९० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. “स्टॅलिन आणि प्रकाश राज यांना संपवले पाहिजे का? हिंदूंनी काय करायला हवं? तुमचे रक्त उकळत नाही का?” अशा प्रकारचा आशय त्या व्हिडीओत आहे.

“पंतप्रधान नक्कीच चिंतेत असतील”, कंगना रणौतचे नरेंद्र मोदींबद्दल विधान; म्हणाली, “त्यांना भीती वाटेलच कारण…”

प्रकाश राज यांनी सांगितलं की व्हिडीओत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नकारात्मक पद्धतीने दाखविण्यात आलं आहे. तसेच ते प्रेक्षकांना आपल्याला नुकसान करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्यांनी त्या व्हिडीओतील आशयाला जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचा स्पष्ट आणि हेतुपुरस्सर प्रयत्न असल्याचं म्हणत चॅनल मालक आणि संबंधित लोकांविरुद्ध त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान प्रकाश राज यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६, ५०४, ५०५ (२) या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

३३ वर्षे ज्या चाळीत राहिले, तिथे जॅकी श्रॉफ यांनी दिली भेट; म्हणाले, “त्या चाळीसाठी माझ्या…”

तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. सनातन धर्म आणि हिंदुत्वाचे आक्रमकपणे समर्थन करणारे लोक हिंदू धर्माचे खरे सार लोकांपर्यंत पोहोचवण्याऐवजी राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचे प्रकाश राज यांनी म्हटले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor prakash raj complaint against youtube channel in bengaluru over death threats hrc