हृतिक रोशन, अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता रणबीर कपूर देखील आपले गायन कौशल्य आजमावणार आहे. ‘बेशरम’ या आगामी चित्रपटात रणबीर गाणार असून, या गाण्याचे शीर्षक ‘प्यार की घंटी’ असे आहे. रणबीरवर चित्रीत होणा-या या गाण्यात तो मजा-मस्ती करताना दिसणार आहे. चित्रपटातील गाण्याची ओळख या गाण्याला प्रथम प्रसिद्धी देऊन करण्याचा विचार निर्माते करत आहेत. या गाण्यात रणबीरबरोबर सुजीत शेट्टी आणि अमितोश नागपाल हे नव-कलाकार दिसणार आहेत. हे गाणे गाण्यासाठी रणबीरची केलेली निवड योग्य असल्याचे मत चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यपने व्यक्त केले. रणबीर कपूरशिवाय या चित्रपटात पल्लवी शारदा, ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्यासुद्धा भूमिका असून, हा चित्रपट २ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 14-08-2013 at 05:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After hrithik roshan akshay kumar and amitabh bachchan it is ranbir kapoors turn to show off his vocal skills ranbir kapoor is all set to sing for besharam