‘धडक’चा ट्रेलर प्रदर्शित होताच कलाविश्वात आणि सोशल मीडियावर अभिनेत्री जान्हवी कपूर आणि इशान खट्टरचीच जोरदार चर्चा होऊ लागली. एकीकडे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवीचा हा पहिलाच चित्रपट आणि दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या ‘सैराट’चा हा हिंदी रिमेक असल्याने ही चर्चा होणं साहजिकच आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात एक मराठमोळा चेहरा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे आणि या अभिनेत्रीची झलक ट्रेलरमध्येही पाहायला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा मराठमोळा चेहरा म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. यामध्ये त्या मधुकर म्हणजेच इशानच्या आईची भूमिका साकारणार आहेत. ‘सैराट’मध्ये वैभवी परदेशी यांनी परश्याच्या आईची भूमिका साकारली होती. आता त्या भूमिकेत ऐश्वर्या नारकर पाहायला मिळतील. त्या बऱ्याच दिवसांपासून छोट्या पडद्यावर कार्यरत आहेत. मात्र आता ‘धडक’च्या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

ऐश्वर्या नारकर

#Vishwaroop2Trailer : ‘मुसलमान होना गुनाह नहीं है, लेकीन..’

‘धडक’मध्ये राजस्थानी पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. तर ट्रेलरमध्ये ट्रेलरमधील जान्हवी आणि इशानची जबरदस्त केमिस्ट्रीसुद्धा पाहायला मिळाली. यातले बरेचसे दृश्य ‘सैराट’ची आठवण करून देतात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya narkar to play role in dhadak janhvi kapoor ishaan khatter