दमदार अभिनय आणि मनमोहक सौंदर्य या दोन गोष्टींमुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सध्या ती मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट १’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्याला चाहत्यांची चांगली पसंती मिळाली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतीच ऐश्वर्या राय वांद्र्यातील एका स्टुडिओमध्ये पोहोचली होती. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावेळी तिच्या लूकमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

सध्या ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ऐश्वर्याही पूर्णपणे काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचे जॅकेट आणि पँट परिधान केली आहे. त्यासोबतच तिने काळ्या रंगाचे शूज, मास्क आणि चष्मा घातला आहे. यावेळी ती तिचे तोंड लपवत गाडीत बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. या लूकमध्ये तिला अजिबातच ओळखता येत नाही.

आणखी वाचा : ऐश्वर्या रायच्या आईचे वाढदिवसानिमित्त जंगी सेलिब्रेशन, फोटो शेअर करत म्हणाली…

यात ती स्टुडिओमधून बाहेर पडून आपला चेहरा लपवत थेट गाडीत जाऊन बसताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी संतापल्याचे पाहायला मिळत आहे. तिला अनेकजण ट्रोल करताना दिसत आहेत. तिच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने मॅडमचा अॅटिट्यूड पाहिलात का? असे म्हटले आहे. तर एकाने ती आता म्हातारी झालीय, आता काय फोटो देणार अशी कमेंट दिली आहे. या ट्रोलिंगबाबत अद्याप ऐश्वर्या रायने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आणखी वाचा : पनामा पेपर लीक प्रकरणात ईडीच्या चौकशीनंतर ऐश्वर्या रायची पहिली पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली…

दरम्यान मणिरत्नम यांनी १९९७ मध्ये ‘इरुवर’ या चित्रपटातून ऐश्वर्या रायला लाँच केलं होतं. यानंतर या जोडीने ‘रावण’ आणि ‘गुरू’ या चित्रपटातही एकत्र काम केलं. त्यानंतर आता ही जोडी पुन्हा एकदा ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट 1’ या चित्रपटाद्वारे एकत्र काम करणार आहे. यात ऐश्वर्या राय बच्चन ही दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती राणी नंदिनी ही भूमिका साकारत आहे. ती पझुवूरची राजकुमारी आहे. तसेच ती मंदाकिनी देवीच्या भूमिकेतही दिसणार आहे. या चित्रपटात चियान विक्रम आदित्य करिकलनच्या भूमिकेत आहे.

याशिवाय वंथियाथेवनच्या भूमिकेत कार्थी, कुंदवईच्या भूमिकेत त्रिशा, अरुलमोळी वर्मनच्या भूमिकेत रवी आणि शोभिता धुलिपाला यांनी वनाथीची भूमिका साकारली आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले जात आहे.