‘दृश्यम २’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अजय देवगण आणि तब्बू मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम’ हा चित्रपट २०१५मध्ये प्रदर्शित झाला होता.

Ajay Devgn, tabbu, Drishyam, Drishyam 2,

मल्याळम भाषेतील सुपरहिट चित्रपट ‘दृश्यम’ २०१३मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०१५मध्ये या चित्रपटाचा हिंदी रिमेक तयार करण्यात आला. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर या चित्रपटाच्या पुढच्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. मल्याळम चित्रपटामध्ये मोहन लाल हे मुख्य भूमिकेत दिसले होते आणि या चित्रपटाचा सिक्वेल फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा हिंदी सिक्वेल देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

डिसेंबरमध्ये अजय देवगण ‘दृश्यम २’चे चित्रीकरण सुरु करणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या अजय ‘मैदान’, ‘थँक गॉड’, ‘मेडे’ आणि वेब सीरिज ‘रुद्र’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. डिसेंबर महिन्यात अजय ‘दृश्यम २’च्या चित्रीकरणास सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे.

दिग्दर्शक अभिषेक पाठक ‘दृश्यम २’चे दिग्दर्शन करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पहिल्या भागाचे दिग्दर्शन निशिकांत कामतने केले होते. त्यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यामुळे दृश्मय २चे दिग्दर्शन अभिषेक पाठक करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता चाहत्यांमध्ये ‘दृश्यम २’ची उत्सुकता पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी अजयचा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता अजयला पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ajay devgn to start shooting for drishyam 2 from december avb

फोटो गॅलरी