अभिनेता अजय देवगणने त्याच्या अभिनयाच्या जोरावर फक्त भारतातच नव्हे तर जगभरात नाव कमावलं. अभिनयाबरोबरच निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून देखील त्याने काम केलं. १९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुल और कांटे’ चित्रपटामधून अजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी अजयने सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अजयच्या चित्रपटामध्ये अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो. ‘फुल और कांटे’ पासून ते अगदी ‘सुर्यवंशी’पर्यंत त्याने वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट केले. रनवे ३४, शिवाय, यु मी और हम सारख्या चित्रपटांचं त्याने दिग्दर्शन केलं. बॉलिवूडमधील फाईट मास्टर वीरु देवगण यांचा मुलगा असलेल्या अजयने स्वतःच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं विश्व निर्माण केलं. २४ फेब्रुवारी १९९९मध्ये अजयने अभिनेत्री काजोलशी लग्नगाठ बांधली. जवळपास गेली २३ वर्ष अजय-काजोल सुखाचा संसार करत आहेत. Read More
यावर्षीही भारतातील टॉप करदात्यांच्या यादीत अनेक नामवंत स्टार्सचा समावेश आहे. फॉर्च्युन इंडियाने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्या…