प्रेमाला कुठे असते Expiry Date? असं म्हणत बऱ्याच वर्षांनी उमेश कामात आणि मुक्ता बर्वे हे कलाकार सोनी मराठी वाहिनीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले.
मालिकेवर आणि या जोडीवर चाहत्यांच्या प्रेमाचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. चाहत्यांनी कविता पाठवून, रांगोळ्या काढून, मालिकेच्या शीर्षक गीताची कॅलिग्राफी केलेली छत्री तयार करून आपलं प्रेम कलाकारांपर्यंत पोचवलं आहे. एवढंच नाही तर #Adira असा हॅशटॅगसुद्धा या जोडीसाठी चाहत्यांनी बनवला आहे.
मीरा आणि आदिराज यांची भेट होईल की नाही, अशी परिस्थिती असताना १० वर्षांनी आदिराज आणि मीरा पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत, आता पुढे त्यांच्या आयुष्यात काय घडणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. भूतकाळात घडलेल्या घटनांचा परिणाम वर्तमानावर होईल का? हे सगळं पुढे उलगडत जाणार आहे.
आदिराज आणि मीरा अजूनही अविवाहित आहेत आणि मीराच्या आयुष्यात तिचा एक मित्रही आहे. आता आदिराजला विसरून मीरा आयुष्याची सुरुवात नव्याने करेल का? आदिराज आणि मीरा यांचं नातं कोणतं वळण घेणार? जाणून घेण्यासाठी चाहत्यांना आगामी भाग पाहावा लागेल.