अक्षय कुमारला त्याच्या आगामी सिनेमात स्कुटर चालवताना तर आपण पाहिले आहे. पण आता अक्षय कुमार कपिल शर्माच्या शोमध्येही स्कुटर चालवताना दिसणार आहे. त्याच्याबरोबर अभिनेत्री हुमा कुरेशीबी स्कुटरवर बसलेली दिसणार आहे.

अक्षयने त्याच्या ‘जॉली एलएलबी २’ या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी द कपिल शर्मा शोच्या सेटवर पोहोचला होता. कपिल शर्मा शोच्या सेटवर त्याने खूप मस्ती केली. त्याने सेटवरचे काही फोटो ट्विटही केले होते. अक्षय कुमारसाठी न्यायालयाचा सेट उभा करण्यात आला होता. या न्यायालयात अक्षयने, कपिल शर्मालाच चौकशीसाठी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.

https://twitter.com/akshaykumar/status/826365129042325505

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’ या आगामी सिनेमाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायलयाने या सिनेमा विरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या सिनेमात वकिलांची किंवा न्यायाधीशांची बदनामी करण्यात आली आहे असा आरोप या सिनेमावर करण्यात आला होता.

तसेच अजय कुमार वाघमारे नावाच्या एका वकिलाने उच्च न्यायालयात या सिनेमा विरोधात याचिका दाखल करत म्हटले होते की, या सिनेमाच्या नावातून एलएलबी हा शब्द वगळण्यात यावा तसेच न्यायालयात वकील पत्ते खेळताना दाखवण्यात आले असल्याचे दृश्यही वगळण्यात यावे अशी मागणी त्याने केली होती. याचिकेत हेही सांगण्यात आले होते की कायद्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत काही प्रतिबंधनही आहेत.

https://twitter.com/akshaykumar/status/827373200904445952

याचिकेनुसार या सिनेमात न्यायालयाशी निगडीत लोकांचे विनोदी चित्रण करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औंरगाबादच्या खंडपीठाने ‘जॉलीएलएलबी २’ हा सिनेमा प्रदर्शनापूर्वी पाहण्यासाठी दोन अमायकस क्युरीची (न्याय मित्र) नियुक्ती केली होती. त्यामुळे अजूनही या सिनेमाच्या प्रदर्शनावर टांगती तलवारच आहे असे म्हणावे लागेल. कारय याचा अंतिम निर्णय ३ फेब्रुवारीला होणार आहे.