बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा याचे यंदाच्या वर्षात लागोपाठ चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे त्याचे यावर्षीचे कॅलेंडर पूर्ण भरलेले आहे असे म्हणावयास हरकत नाही. त्याचे लाल रंग आणि सरबजीत हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले असून दो लफ्जो की कहानी आणि सुलतान हे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. वर्षभरात सर्वाधिक चित्रपट करणा-यांमध्ये अजून एक नाव घेतले जाते ते म्हणजे बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचे.
ज्याप्रमाणे अक्षय वर्षभरात जास्त चित्रपट करतो त्याचप्रमाणे रणदीपचेही यावर्षी बरेच चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे ‘दो लफ्जो की कहानी’च्या पत्रकार परिषदेत रणदीपची तुलना अक्षय कुमारसोबत केली गेली. त्यावर रणदीप म्हणाला की, अक्षय माझ्यापेक्षा चारशेपट जास्त पैसे घेतो. याव्यतिरीक्त आमच्यात कोणताही फरक नाही. खरा खिलाडी म्हणून अक्षयची प्रशंसा करताना पुढे रणदीप म्हणाला की, अक्षय एक असा अभिनेता आहे जो प्रत्येक चित्रपटानंतर अधिक विकसित होत जातोय. त्याच्यासारखा विकसित झालेला अभिनेता मी पाहिलेला नाही. त्याने एक चांगला अभिनेता म्हणून नाव मिळवलेचं पण पुढे त्याने विनोदी चित्रपट केले आणि आता तर तो त्याच्या चित्रपटांद्वारे चांगले चांगले विषय लोकांसमोर आणतोयं. तुम्ही माझी तुलना अक्षयशी करतायं याचा मला आनंद आहे. त्याला नेहमीचं पुढे जाण्याची इच्छा असते आणि मी त्याच्याकडे बघूनचं स्वतःत बदल करतोयं.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jun 2016 रोजी प्रकाशित
अक्षय कुमार माझ्यापेक्षा चारशेपट जास्त पैसे घेतो- रणदीप हुड्डा
रणदीपचे अक्षयसोबत नाव जोडले गेले.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 03-06-2016 at 08:44 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar gets four hundred times more money than me randeep hooda