बॉलिवूडमधील सर्वाधिक चित्रपट करणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता अक्षय कुमार आहे. एका वर्षात अक्षयचे ४ ते ५ चित्रपट प्रदर्शित होतात. अक्षय प्रत्येक चित्रपटात वेगळ्या भूमिका साकारतो. आता अक्षयचा ‘बच्चन पांडे’ चित्रपटातील लूक समोर आला असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

अक्षय सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘बच्चन पांडे’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बच्चन पांडेमधील लूक शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षय वेगळ्या अंदाजात दिसत आहे. अक्षयच्या गळ्यात सोन्याची चेन, डोक्याला रूमाल, कानात बाली आहे. “त्याचा एक लूक पुरेसा आहे. बच्चन पांडे चित्रपट २६ जानेवारी २०२२मध्ये प्रदर्शित होणार” अशा आशयाच कॅप्शन अक्षयने फोटोला दिले आहे. अक्षयचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

अक्षयचा हा चित्रपट २६ जानेवारी २०२२ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय सोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, क्रिती सेनॉन आणि अभिनेता अरशद वारसी देखील आहे. तर अक्षयचा ‘सूर्यवंशी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट मार्च २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षयने ‘बेल बॉटम’चे शूटिंग पूर्ण केले आहे. तर ‘अतरंगी रे’, ‘पृथ्वीराज’, ‘राम सेतु’, ‘मिशन लायन’, ‘रक्षाबंधन’ अक्षयचे असे अनेक चित्रपट येत्या दोन वर्षात प्रदर्शित होणार आहेत.