सध्या सर्वत्र ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाची हवा आहे. ३० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी चित्रपट हिंदीसह अन्य तीन भाषांमध्ये डब करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली. १४ ऑक्टोबरला हिंदीमध्ये डब केलेला ‘कांतारा’ चित्रपटगृहामध्ये दाखल झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. रिषभ शेट्टी हे या चित्रपटाचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. यामधील शिवा हे मुख्य पात्र त्यांनीच साकारले आहे. त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दल लोकांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्नाटकमधल्या एका छोट्या गावातली गोष्ट ‘कांतारा’मध्ये दाखवण्यात आली आहे. स्वत:ला राजा म्हणवून घेणारा जमीनदार आणि गावामध्ये राहणारे गरीब, अशिक्षित शेतकरी यांच्यामधील संघर्ष या चित्रपटामध्ये पाहायला मिळतो. रिषभ व्यतिरिक्त सप्तमी गौडा, किशोर, अच्युत कुमार अशा कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केले आहे. दक्षिण भारतातील लोककथांचा प्रभाव चित्रपटात प्रकर्षाने जाणवतो. या चित्रपटामुळे भूत कोला या पारंपारिक नृत्यप्रकाराला प्रसिद्धी मिळाली आहे.

आणखी वाचा – १३ वर्षांनी मोठ्या आदित्य रॉय कपूरला डेट करतेय अनन्या पांडे? पार्टीमधील ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण

अभिनेता अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद पेशाने चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी एका कार्यक्रमामध्ये रिषभ शेट्टीसह चित्रपट तयार करणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, “मी त्यांच्याशी चित्रपटांबद्दल चर्चा करत होतो. बोलताना मी त्याला गीता आर्ट्स निर्मिती संस्थेअंतर्गत चित्रपट करणार का असे विचारले. त्यावर त्याने लगेच होकार दिला.” या कार्यक्रमाला रिषभ यांनी हजेरी लावली होती.

आणखी वाचा – तुम्ही टिव्हीवरील कोणता कार्यक्रम आवडीने पाहता? आदित्य ठाकरे म्हणतात…

तेव्हा रिषभ यांनी ‘कांतारा’चा सिक्केल येणार नसल्याची घोषणा केली. आगामी चित्रपटाला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा ब्रेक घेणार आहे असेही ते म्हणाले. सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटाने आतापर्यंत २५० कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allu arjuns dad announces film with kantara fame rishab shetty yps