बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि रेखा या जोडीला रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा आता अपूर्ण राहणार आहे. कारण या दोघांनीही एकत्र काम करणार असल्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
अनिस बज्मीच्या आगामी ‘वेलकम बॅक’ या चित्रपटात रेखा आणि अमिताभ ब-याच वर्षांनी एकत्र काम करणार असल्याची चर्चा मध्यंतरी होती. मात्र रेखा यांनी तारखांचे कारण देत अनीस बज्मी यांना आपला नकार कळवला आहे. इतकेच नाही तर अमिताभ यांनीही चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे.
रेखा आणि अमिताभ आपला भूतकाळ विसरून या एकत्र काम करण्यास होकार देतील अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र या दोघांनीही चित्रपटाला नकार देऊन चाहत्यांची निराशा केली आहे. ‘वेलकम बॅक’ हा २००७ साली आलेल्या ‘वेलकम’चा सिक्वल आहे. यात फिरोज खान, अक्षय कुमार, कटरिना कैफ, नाना पाटेकर आणि अनिल कपूरची मुख्य भूमिका होती. आता फिरोज खानची डॉनची भूमिका नसिरूद्दीन शाह करणार आहेत, तर रेखा यांचा रोल डिंपल कपाडिया करणार आहे. नाना पाटेकर आणि अनिल कपूरही या चित्रपटात काम करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2013 रोजी प्रकाशित
‘वेलकम बॅक’ला अमिताभ-रेखा यांचा नकार
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि रेखा या जोडीला रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा आता अपूर्ण राहणार आहे.
First published on: 29-11-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan and rekha said no to welcome back