‘व्हेलेंटाईन’च्या मुहूर्तावर प्रियांकासोबतचा फोटो फेसबुक प्रोफाइल पिक्चर ठेऊन आयुष्यात प्रेम परतल्याची चाहुल देणाऱ्या शशांकने त्याची आयुष्याची जोडीदार नव्याने निवडला आहे. शशांक केतकर आणि प्रियांका ढवळे यांनी साखरपुडा करुन ऐकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली आहे. शशांक आणि प्रियाका यांच्या साखरपुड्याचे फोटो अभिनेत्री अमृता खानविलकर हिने तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवरुन शेअर केले असून दोघांनाही तिने नव्या आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांका आणि शशांक आता लग्न कधी करणार? याची दोघांच्या चाहत्यांना उत्सुकता असेल.

जगभरासह देशात प्रेम दिवस म्हणजेच ‘व्हेलेंटाईन डे’ साजरा होत असताना शशांकने प्रियांकासोबतचा फोटो फेसबुकवर प्रोफाईल पिक्चर म्हणून ठेवला होता. त्यावेळी हा फोटो त्याच्या आयुष्यात प्रेम परतल्याची चाहूल देणारा असाच होता. तर दुसरीकडे प्रियांकाने इन्स्टाग्रामवरुन शशांकचा फोटो शेअर करुन दोघांच्यात प्रेम फुलत असल्याच्या चर्चेला आणखी पक्के केले. शशांक आणि प्रियांकाच्या फोटोमुळे दोघांमध्ये प्रेम फुलत असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. शशांकने प्रियांकासोबतचा हा फोटो फेसबुक डीपीला लावताच अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेसुद्धा या फोटोवर प्रतिक्रिया दिली होती. मात्र, त्यावेळी या दोघांनीही या गोष्टीला दुजोरा दिला नाही. फोटोतील ती अर्थात प्रियांका प्रेसयी असल्याचे शशांकने मान्य केले नाही. तसचे प्रियांकाही मैत्रीचे नाते असल्याचे म्हटले होते.

शशांक केतकर विषयी बोलायचे तर, ‘होणार सून ह्या या घरची’ या मालिकेतून ‘श्री’च्या भूमिकेतून तो घराघरापर्यंत पोहोचला. या मालिकेत त्याच्या पत्नीच्या रुपात जान्हवीची व्यक्तिरेखा तेजश्री प्रधानने साकारली होती. या दोघांनी प्रेक्षकांची मने जिंकली. पडद्यावरील नवरा-बायको वास्तवातही एक झाले. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. एका वर्षात शशांक आणि तेजश्री विभक्त झाले होते.