बॉलिवूडमधील सध्याच्या हॉट टॉपिक म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं अफेअर. गेल्या काही दिवसांपासून ही जोडी सातत्याने चाहत्यांमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. मलायका- अर्जुन यांचं नात आता जगजाहीर झालं असून त्यांच्या कुटुंबीयांनादेखील हे नातं मान्य असल्याचं पाहायला मिळतं. मात्र आता त्यांच्या नात्यावर अभिनेता अनिल कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिकडेच अभिनेत्री मलायका अरोराने तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला. यावेळी अर्जुनने मलायकाला खास शुभेच्छा दिल्या. तेव्हापासून सध्या ही जोडी चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे आता अनिल कपूर यांनी त्यांच्या नात्याविषयी भाष्य केलं असून त्यांना हे नातं मान्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मलायकाला डेट करत असल्यामुळे अर्जुनचे कुटुंबीय नाराज असल्याची मध्यंतरी चर्चा रंगली होती. मात्र, अर्जुनच्या कुटुंबीयांना हे नातं मान्य असून अनिल कपूरनेदेखील या दोघांना पाठिंबा दिला आहे.

“अर्जुन लहान असल्यापासून मी त्याला ओळखतोय. त्यामुळे तो चुकीचा निर्णय नाही घेणार. हा त्याच्या खासगी प्रश्न आहे. त्यामुळे ज्यात अर्जुनचा आनंद आहे, तोच आमचादेखील आनंद आहे”, असं अनिल कपूर म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “ज्याला एखाद्या गोष्टीमुळे आनंद मिळतो, त्याच्या त्याच आनंदामध्ये आम्ही कुटुंबीय आमचा आनंद पाहतो. दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद असतो. मी खरंच खुश आहे आणि याविषयी मला फार काही बोलायचंदेखील नाही.”

दरम्यान, अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. विशेष म्हणजे मलायका – अर्जुनचं नातं मलायकाच्या मुलालादेखील मान्य असून तोदेखील या दोघांसोबत राहत असल्याचं सांगण्यात येतं. सध्या मलायका एका डान्स रिअॅलिटी शोच्या परिक्षक पदाची जबाबदारी पार पाडत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kapoors reaction on arjun kapoor and malaika arora relation ssj