नेटकऱ्यांचा सर्वात आवडता विषय म्हणजे एखाद्या अभिनेत्री किंवा लोकप्रिय व्यक्तीच्या फोटोवर आपल्या कल्पना शक्तीचा वापर करत भन्नाट मीम्स तयार करणं असे म्हणायला हरकत नाही. नुकताच विराट कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नी अनुष्का शर्मासोबत बीचवर निवांत वेळ घालवतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनुष्का अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे. पण आता या फोटोवर गमतीशीर मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.
या फोटोमध्ये अनुष्काने बिकिनी परिधान केली असून दोघेही अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे. दरम्यान दोघेही एकमेकांच्या कुशीत दिसत आहेत. नेटकऱ्यांनी त्या दोघांची तुलना ‘शोले’ चित्रपटातील अभिनेते धर्मेंद्र आणि अमजद खान यांच्यासह केली आहे. तर एका नेटकऱ्यांनी ‘मान्यवर स्विमवेअर’ असे म्हटले आहे. पाहा व्हायरल मीम्स..
Good try…but no where close to the legends pic.twitter.com/eGdpBLwzV7
— बकैत (@raja_koomar) September 11, 2019
Manyavar Swim Wear https://t.co/b7f6NgQpst
— Vipul Goyal (@HumorouslyVipul) September 11, 2019
Close Enough. pic.twitter.com/7kA9YCB8Ex #kohli #AnushkaSharma #VIRATism
— Amit Chaturvedi (@Amit_knc) September 11, 2019
This cracked me up #AnushkaSharma #Bollywood pic.twitter.com/y0rexos4Wb
— Arpan (@arpanmonktyagi) September 12, 2019
— Cute Kamina (@bittu7664) September 11, 2019
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर निर्भेळ यश संपादन केलं. टी-२०, वन-डे आणि कसोटी मालिकेत भारताने यजमानांना व्हाईटवॉश दिला. १५ सप्टेंबरपासून भारत घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. मात्र ही मालिका सुरु होण्याआधी विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मासोबत बीचवर निवांत वेळ घालवताना दिसत आहे. विराट नेमक्या कोणच्या बीचवर आहे, हे त्याने सांगितलं नसलं तरीही त्याच्या या फोटोला नेटीझन्सनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारत ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे.