सध्या चित्रपटसृष्टीमध्ये लग्नाची धामधूम पाहायला मिळते. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, आशुतोष कुलकर्णी, अभिज्ञा भावे, मानसी नाईक यांच्या पाठोपाठ आता अभिनेता अस्ताद काळे लग्न बंधनात अडकणार आहे. अस्ताद अभिनेत्री स्वप्नाली पाटीलशी लग्न करणार आहे. नुकताच त्यांच्या केळवणाचे फोटो समोर आले आहेत.

बिग बॉस विजेती मेघा धाडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अस्ताद आणि स्वप्नालीच्या केळवणाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून चर्चेत आहे.

बिग बॉसच्या घरात अस्तादने त्याची लव्हस्टोरी सांगितली होती. तो स्वप्नालीसोबत रिलेशमध्ये असल्याची कबुली त्याने दिली होती. त्यानंतर अस्ताद आणि स्वप्नाली चर्चेत होते. ते दोघेही सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करताना दिसतात. आता ते दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याने चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.