नव्वदच्या दशकात अभिनेत्री आयशा जुल्काने बॉलिवूड गाजवलं होतं. आयशा चित्रपटांसोबतच तिच्या अफेअर्ससाठीही अनेकदा चर्चेत राहिली. ही आयशा कोण हे तुमच्या लक्षात आलं नसेल तर ‘जो जीता वही सिकंदर’ चित्रपटातील अंजलीला आठवा. चित्रपटात आमिर खानच्या बालमैत्रिणीची भूमिका साकारलेली ही तीच आयशा जुल्का. मुंबईतील एका कार्यक्रमात नुकतंच तिला पाहिलं गेलं आणि यावेळी कॅमेरांमध्ये ती टिपली गेली. या फोटोंमध्ये तिचं खूप वजन वाढलेलं दिसतंय. नव्वदाव्या दशकात बॉलिवूड गाजवणाऱ्या आयशाला या फोटोंमध्ये ओळखणंसुद्धा कठीण होतंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२८ जुलै १९७२ मध्ये श्रीनगर, काश्मीरमध्ये जन्मलेल्या आयशाचे वडील एअरफोर्समध्ये कामाला होते. त्यामुळे कामासाठी त्यांची नेहमीच बदली व्हायची. आयशा १२ वर्षांची असताना तिचे संपूर्ण कुटुंब दिल्लीला स्थलांतरित झालं. त्यानंतर तिने दिल्लीतच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. लहानपणापासूनच आयशाला अभिनयाची फार आवड होती. चित्रपट पाहणे, नृत्य करणे, चित्रपटांतील संवाद आपल्या स्टाईलमध्ये बोलणे तिला फार आवडायचे. १९८३ मध्ये ‘कैसे कैसे लोग’ या चित्रपटातून तिने करिअरला सुरुवात केली. त्यानंतर जवळपास ७ वर्षे ती चित्रपटांपासून लांब राहिली. १९९० मध्ये ‘कुर्बान’ चित्रपटात तिने सलमान खानसोबत भूमिका साकारली. मात्र दुर्दैवाने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही समस्यांमुळे आयशाला तिचे करिअर सोडावे लागले.

१९९२ मध्ये अक्षय कुमारसोबत ‘खिलाडी’ आणि त्याच वर्षी आमिर खानसोबत ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटांमुळे आयशाच्या करिअरने झेप घेतली. या चित्रपटांसोबत तिच्या अफेअर्ससाठीही आयशा नेहमीच चर्चेत होती. रवि बहल, अरमान कोहली, अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती, नाना पाटेकर अशी अनेक नावं तिच्यासोबत जो़डली गेली. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आंच’ चित्रपटानंतर आयशा बॉलिवूडपासून दूर जाऊ लागली. त्याच वर्षी तिने समीर वाशी या बांधकाम व्यावसायिकाशी तिने लग्न केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayesha jhulka recently spotted in an event in mumbai