मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. मराठी व बॉलीवूड कलाकारांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच ‘बाहुबली’ फेम अभिनेता ४७ व्या वर्षी लग्नबंधनात अडकला आहे. त्याने त्याच्या लग्नातील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बाहुबली: द कन्क्लूजनमध्ये कुमार वर्माची भूमिका साकारणारा सुब्बा राजूने लग्नगाठ बांधली. ‘पोकिरी’, ‘मिर्ची’ अशा सिनेमांमध्ये आपल्या कामांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सुब्बा राजूने आयुष्यात नवीन इनिंगला सुरुवात केली आहे. त्याने पत्नीबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर करून लग्न झाल्याचं चाहत्यांना सांगितलं.

हेही वाचा – शुभमंगल सावधान! लोकप्रिय अभिनेत्याने अभिनेत्री पूजा जोशीशी बांधली लग्नगाठ, थाटामाटात पार पडला सोहळा

सुब्बा राजूने ‘Hitched finally’ असं कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे. यात तो आणि त्याची पत्नी समुद्रकिनाऱ्यावर उभे दिसत आहेत. दोघांनीही पारंपरिक पोशाख आणि सनग्लासेस घातलेले आहेत. फोटोत ते एकमेकांकडे पाहताना दिसत आहेत. त्याच्या या फोटोवर कलाकार व चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्याला आयुष्यातील या नवीन प्रवासासाठी सर्वजण शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा – नागा चैतन्यच्या लग्नाआधी सावत्र भावाने दिली गुड न्यूज; साखरपुड्याचे फोटो केले शेअर, ८ वर्षांपूर्वी मोडलेलं लग्न

सुब्बा राजूने शेअर केलेला फोटो –

सुब्बा राजू हा मूळचा आंध्र प्रदेशातील भीमावरम इथला आहे. त्याने तेलुगू सिनेसृष्टीत उल्लेखनीय काम केलं आहे. दिग्दर्शक कृष्णा वामसीच्या ‘खडगम’ या चित्रपटातून त्याने त्याच्या करिअरची सुरुवात केली. २००३ साली आलेल्या ‘अम्मा नन्ना ओ तमिला अम्मी’ या चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने रवी तेजा आणि असीनबरोबर स्क्रीन शेअर केली होती. यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही आणि अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

हेही वाचा – Video: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने २७ व्या वर्षी उरकला साखरपुडा; सुंदर व्हिडीओ शेअर करून दिली गुड न्यूज

सुब्बा राजू ‘आर्या’, ‘पोकिरी’, ‘बिल्ला’, ‘खलेजा’ आणि ब्लॉकबस्टर ‘बाहुबली: द कन्क्लूजन’ सारख्या चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या आहे. सुब्बा राजूने ‘बाहुबली: द कन्क्लूजनमध्ये कुमार वर्माची भूमिका साकारली होती. सुब्बा राजू शेवटचा या वर्षी आलेल्या ‘जितेंदर रेड्डी’ चित्रपटात झळकला होता. सध्या तो त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baahubali actor subba raju got married at 47 see wedding photo hrc