बिग बॉसच्या घरातील खमंग चर्चा आणि बातम्या नेहमीच ऐकायला मिळतात. याठिकाणी स्पर्धक सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. एखादे क्षुल्लक कारणही याठिकाणी मोठ्या भांडणाला आमंत्रण देणारे ठरू शकते. परंतु दुसरीकडे भांडणांशिवाय घरातील स्पर्धक मजा -मस्तीही करतात.
अशाच एका प्रसंगाच्यावेळी घरातील स्पर्धक अर्शी खानचे सामान्य ज्ञान तपासून पाहत होते. पण अर्शीची परीक्षा घेण्याच्या नादात हिना खानने तिचे सामान्य ज्ञान किती तोकडे आहे, हे दाखवून दिले. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे हिना सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
Video presenting a very overconfident Miss Right #HinaKhan
This is what happens when overconfidence takes overShe was trying to make fun of Arshi
And ended up making a fool out of herself
She got caught in her own trap #BB11 #WeekendKaVaar
Please LikeRT Enjoy pic.twitter.com/6vwqweqjaM— Jonathan Groff fan (@emocraze) December 3, 2017
तिने अर्शीला प्रश्न विचारला की, असा कोणत्या देशामध्ये हवामानाचे चार उष्णकटिबंधीय प्रदेश आहेत? तिने विचारलेला प्रश्नच मुळात चुकीचा होता. कारण तिने चार उष्णकटिबंधीय हवामानाबद्दल विचारले. पण मुळात फक्त दोनच उष्णकटिबंधीय हवामान असतात. जेव्हा कोणालाही याचे उत्तर देता आले नाही तेव्हा तिने आफ्रिका असे उत्तर दिलं. तिने दिलेलं हे उत्तर ही चुकीचं आहे. कारण आफ्रिका हा देश नसून एक खंड आहे.
LMAO Congratulations Ms Hina Khan just discovered a new country called Africa #BB11 https://t.co/bRUtrDJFwL
— Aηiishα ⚡ (@AnishaS_tweets) December 4, 2017
विकासला सोडून घरातील कोणत्याही स्पर्धकाला हिनाची चूक लक्षात आली नाही. विकासने तिला तिची चूक दाखवून दिली तेव्हा हिनाने लगेच विषय बदलला. त्यानंतर अर्शीला दुसरा प्रश्न विचारण्यात आला. यानंतर हिनाने अर्शीला ७ खंडांची नावं सांगायला सांगितले. या सगळ्या खेळात हिनाच्या सामान्यज्ञानाच्या मर्यादा दिसून आल्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवली जात आहे.