बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी सध्या ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून शमिता राकेश बापटसोबत असलेल्या तिच्या रोमान्समुळे चर्चेत होती. मात्र, विकेंड का वार पासून त्यांच्यात सतत वाद सुरु आहेत. त्यांच्यात भांडण झाल्यापासून राकेश आणि शमिता एकमेकांपासून लांब राहत आहेत. त्यात आता शमिताने ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये असलेली तिची मैत्रिण नेहा भसीनला तिच दुःख शेअर करताना दिसत आहे. शमिताने यावेळी खुलासा केला की तिचा पहिला बॉयफ्रेंडचा अपघात झाला होता आणि तेव्हा त्याचे निधन झाले.
या आधी निशांत आणि प्रतीकने ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात शमिता राकेशवर वर्चेस्व करण्याचा प्रयत्न करते असे बोलतात. त्यावर आता शमिताने वक्तव्य केलं आहे. हे ऐकून शमिता रागावली. तर राकेशने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही हे पाहता शमिताला वाईट वाटलंय. यावेळी शमिता नेहाला म्हणाली, ‘ती १८ वर्षांची असताना तिचा पहिल्या बॉयफ्रेंडचे निधन झाले. हेच कारण आहे की शमिताने तिच्या आयुष्यात इतके दिवस कोणालाही येऊ दिले नाही. बऱ्याच वर्षांनंतर, आता राकेशसोबत रिलेशनमध्ये येण्याचा प्रयत्न केला कारण राकेश तिला आवडतो.’
आणखी वाचा : BB OTT : ‘मला मुल पाहिजे पण…’, शमिताने राकेशला सांगितली तिच्या मनातली इच्छा
त्यानंतर नेहा शमिताला समजावते की ‘राकेशने शमिताला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला आहे. ४ आठवड्यांपासून राकेश नेहमी तिला पाठिंबा देत आहे.’ दरम्यान, शमिताने अजुन लग्न केलेले नाही तर राकेश बापट आणि पत्नी रिद्धी डोगरा हे विभक्त झाले आहेत.