या एकाच सत्काराचाही भरपूर सकारात्मक परिणाम होईल, हे जास्तच महत्त्वाचे आहे. एक तर हे सत्कारमूर्ती ३०-३५ वर्षांच्या कारकिर्दीनंतरही अधिक उत्साहाने काम करतील. (यामध्ये विजय भोपे, शिवाजी कारले, मोहम्मद भाई, आशा मालपेकर इत्यादी) पण आपल्या माणसाचा असा सत्कार झाल्याने जवळपास संपूर्ण मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा कामगारांवर सकारात्मक परिणाम होईल. आपल्यालाही कधी तरी असा सत्काराचा योग येईल ही त्यांची आशा/ अपेक्षा त्यांना मानसिक समाधान देणारी ठरेल. हे खूपच महत्त्वाचे असते. अन्यथा वर्षानुवर्ष हे स्पॉटबॉय, जेवणाची व्यवस्था करणारे, सेट उभारण्यात हातभार लावणारे एकाच पद्धतीच्या कामात अडकून पडतात. एखादा दिग्दर्शक एका स्टुडिओत चहा बॉय म्हणून कामाला सुरुवात तर करतो पण मेहनतीने या व्यवसायात पुढची पावले टाकतोही. याउलट अभिनेत्री म्हणून पहिल्याच चित्रपटाला अपयश लाभल्याने हेअर ड्रेसर होणेही नशिबी आल्याचे घडलंय. पूर्वी नटराज स्टुडिओतील कॅंटिनमधून मुंबईतील काही स्टुडिओत दुपारचे जेवण जाई त्यामुळे नटराज स्टुडिओत एखाद्या चित्रपटाचा मुहूर्त झाल्यावर या कॅंटिनमध्ये गेल्यावर हिंदीतील कोणता स्टार कुठे बरे चित्रीकरण करतोय याचे तपशील मिळत. राजेश खन्ना तर काही वेळेस घरुन आलेले जेवण सेटवर एका टेबलावर मांडल्यावर आजूबाजूला नजर टाकून कोणी कामगार जेवायचा राहिलाय का, हे पाहायचे व त्याला ताट भरून देई. धर्मेंद्र कितीदा तरी गरजू कामगाराला मोठी नोट देई. अर्थात ही काही मोजकी उदाहरणे दिलीत. काही स्टार्सना या कामगारांचे अस्तित्व जाणवतच नाही असेही किस्से आहेत. तर काहीना हे सगळे लक्षात यायला काही स्टारना कालावधी जावा लागतो. कारण ते पडदाभरचे ग्लॅमर म्हणजेच येथील वास्तव समजतात. प्रत्यक्षात एकाद्या खूपच जुन्या स्टुडिओतील मेकअप रुमची अवस्था (खरं तर दुरावस्था) पाहिल्यावर ते गांगरतात. चित्रपटसृष्टीतील सर्वच विभागातील कामगारांना मात्र या सगळ्याच परिस्थितीची योग्य जाणीव असते. असे बिनचेहऱ्याने वावरणारे कामगार या क्षेत्रात भरपूर आहेत. त्यानाही शाबासकीची गरज असतेच. प्रत्यक्षात मात्र त्याच त्याच स्टारना वर्षभर सतत कुठेना कुठे नामांकन व पुरस्कार मिळतच असतात. त्यातील किती स्टारना या पुरस्काराचे मूल्य वाटते व किती जण त्याकडे शोभेची बाहुली म्हणून पाहतात हा प्रश्नच आहे. पण कामगाराला मात्र आयुष्यात मिळणारा एक पुरस्कार म्हणजे तो कुठे ठेवू नि कुठे नको असे वाटणारा आहे. अशा पुरस्काराला ग्लॅमर नसले तरी त्याचे थोडेसे का होईना पण प्रमाण वाढायला काय हरकत आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने असे पुरस्कार देण्यात येतात हे विशेषच कौतुकास्पद आहे. ‘चिरायू’ने या सगळ्यांवर फोकस टाकण्याची संधी मिळालीय…
– दिलीप ठाकूर
संग्रहित लेख, दिनांक 4th Apr 2017 रोजी प्रकाशित
BLOG : …अॅण्ड अॅवार्ड गोज् टू दादा!
हा पुरस्कार कुठचा, कोणाला, कशाला, का बरे असे 'क'च्या बाराखडीतील प्रश्न तुम्हाला पडले असतीलच.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 04-04-2017 at 10:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog by dilip thakur chirayu dada awards