बॉक्स ऑफिसवर २०२२ मध्ये सर्वाधिक कमाई केलेल्या असलेल्या चित्रपटांमध्ये सामील असणारा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इंटरनॅशन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) याचं निमित्त ठरलं आहे. इफ्फीचे ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाची चर्चा रंगली असून, वाद निर्माण झाला आहे. गोव्यात आयोजित ५३ व्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलताना नदव लॅपिड यांनी हा चित्रपट ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ असल्याचं जाहीरपणे सांगितलं. यानंतर बॉलिवूडमधून प्रतिक्रिया उमटत असून चित्रपटात प्रमुख भूमिका निभावणारे अभिनेते अनुपम खेर यांनीही भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हा प्रोपगंडा आणि वल्गर चित्रपट…” IFFI मध्ये मुख्य ज्युरींनीच साधला ‘द काश्मीर फाईल्स’वर निशाणा

अनुपम खेर यांनी लॅपिड यांच्या विधानावर टीका केली असून, चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही त्यांना लक्ष्य केलं आहे. हा काश्मिरी जनतेचा अपमान असल्याचं अशोक पंडित म्हणाले आहेत. तसंच नदव लॅपिड यांना इफ्फीचे ज्युरी हेड केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाही लक्ष्य केलं.

इफ्फीचे ज्युरी हेड नेमकं काय म्हणाले?

गोव्यातील पणजी येथे सुरु असलेल्या कार्यक्रमात इस्त्रायलच्या चित्रपट दिग्दर्शकाने ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर जोरदार टीका केली. “काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित आणि त्रस्त आहोत. हा चित्रपट आम्हाला घाणेरडा तसंच प्रचार करणारा वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेची आहे,” असं ते म्हणाले.

अनुपम खेर यांची नाराजी

चित्रपटावर टीका झाल्याने अनुपम खेर यांनी नाराजी जाहीर केली आहे. “असत्याची उंची कितीही मोठी असली, तरी सत्याच्या तुलनेत ती छोटीच असते,” असं ट्वीट अनुपम खेर यांनी केलं आहे.

अशोक पंडित यांनीही ट्वीट करत आपली नाराजी जाहीर केली आहे. “माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नदल लॅपिड यांना इफ्फी ज्युरी हेड करणं सर्वात मोठी चूक होती. यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

नदव लॅपिड यांनी भारताच्या दहशतवादविरोधी लढाईची खिल्ली उडवली आहे. तसंच सात लोख काश्मिरी पंडितांचा अपमान केला असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor anupam kher on iffi jury head nadav lapid calling the kashmir files vulgar and propaganda sgy