प्रियांका परदेशातच जास्त दिवस वास्तव्यास असते. पण, वेळ मिळेल तेव्हा ती भारतात येते आणि प्रत्येक फेरीत आपल्यासोबत इथल्या भरपूर आठवणी घेऊन जाते. सध्या ही ‘देसी गर्ल’ मायदेशी परतली असून, गणेशोत्सवाच्या या सर्व वातावरणाचा आनंद घेताना दिसतेय. कामाच्या व्यापातून वेळ काढत तिने लालबागच्या राजाचंही दर्शन घेतलं आहे. प्रियांकाने यासंबंधीचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही पोस्ट केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर प्रियांकाने तिचा मोर्चा वळवला तो म्हणजे मुंबईच्या या अथांग समुद्र किनाऱ्याकडे. रात्रीच्या अंधारात, हवेची झुळूक आणि कधीही न थांबणाऱ्या या शहरात असल्याचा आनंद प्रियांकाने अनुभवला. मुंबईच्या मरिन ड्राइव्ह येथील समुद्र किनाऱ्यावर प्रियांकाने काही क्षण व्यतीत केले असून, तिने या सुरेख क्षणाचा एक फोटोसुद्धा पोस्ट केला.

सोबतच तिने या फोटोला साजेसं कॅप्शनही दिलं. समुद्र म्हटलं की अनेकांच्याच विविध आठवणी जाग्या होतात. प्रियांकाचंही असंच काहीसं झालं. ‘बऱ्याच वर्षांनंतर मी मरिन ड्राइव्हच्या समुद्र किनारी बसले आहे. मॉडेलिंग करत असताना इथे येणं ही माझी सर्वात आवडती गोष्ट होती’, असं कॅप्शन तिने दिलं आहे. यासोबत तिने #queensnecklace #simplepleasures #PostDarshanChill #incognito #midnightTafree #mumbairomance हे हॅशटॅग्सही दिले आहेत.

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

मुंबई हे शहर प्रत्येकाला बरंच काही देऊन जातं. भरभरून आयुष्य जगण्याची प्रेरणा देणाऱ्या शहराचं आपल्या आयुष्यात असलेलं स्थान प्रियांका आजही विसरु शकली नाहीये हे तिच्या कॅप्शनवरुन लक्षात येत आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या या उत्साही वातावरणातच प्रियांका तिच्या आगामी चित्रपटाशी संबंधित काही कामांमध्येही व्यग्र आहे. येत्या काळात संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ‘देसी गर्ल’ तिचं पुढचं प्रोजेक्ट साइन करु शकते असं म्हटलं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress priyanka chopra visits marine drive after lalbaugcha raja ganpati darshan in mumbai