Premium

बोमन इराणींना लहानपणी डफर का म्हटलं जायचं? ‘मुन्नाभाई..’ सिनेमा कसा मिळाला? वाचा माहित नसलेले किस्से

बोमन इराणी यांचा वाढदिवस, वयाच्या चाळिशीनंतर सिनेमा करिअर सुरु करणाऱ्या अभिनेत्याची गोष्ट

boman irani Birth Day Special
अभिनेते बोमन इराणी यांचा वाढदिवस

वयाच्या चाळिशीनंतर एखादा माणूस अभिनेता होईल असं कुणाला सांगितलं तर खरं वाटेल का? मात्र बोमन इराणी हा असा अभिनेता आहे ज्यांच्या बाबतीत हे वास्तव आहे. वडिलांचा वेफर्सचा व्यवसाय सांभाळणारे आणि नंतर ताज हॉटेलमध्ये नोकरी करणारे बोमन इराणी सिनेमा क्षेत्रात आले आणि त्यांनी विविध भूमिका करुन प्रेक्षकांना अक्षरशः आपल्या प्रेमात पाडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोमन इराणींचं बालपण खडतर

बोमन इराणी यांचा जन्म २ डिसेंबर १९५९ चा. मात्र त्यांच्या जन्माच्या आधीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे ते वडिलांना पाहू शकले नाहीत. त्यांचे वडील वेफर्सचं दुकान चालवायचे. ते दुकान चालवत असतानाच ते आजारी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. १९५९ मध्ये बोमन इराणींच्या वडिलांना ६० हजारांचं कर्ज झालं होतं. मात्र त्यांची आई हिंमत हरली नाही. त्यांच्या आईने हे दुकान हाती घेतलं, मुलांना शिकवलं आणि मोठं केलं. मात्र बोमन इराणी यांचं बालपण खडतर होतं. बोमन इराणी यांनी वेटर्स कोर्स केला होता. कारण शैक्षणिकदृष्ट्या ते फारसे प्रगती करु शकले नव्हते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why was boman irani called a duffer as a child munnabhai how did you get the movie read stories you do not know entdc scj

First published on: 02-12-2023 at 10:39 IST
Next Story
‘अ‍ॅनिमल’नंतर आता त्याच्या सीक्वलची चर्चा; चित्रपटातील ‘तो’ सीन पाहून प्रेक्षक ‘अ‍ॅनिमल पार्क’साठी उत्सुक