छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेकडे पाहिले जाते. या मालिकेतील जेठालाल, चंपकलाल, हाती, बाघा हे कलाकार सतत चर्चेत असतात. आता तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत बाघा ही भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारियाने सोशल मीडियावर २००७मधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील चंपकलाल कोणता हे तुम्ही ओळखू शकता का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तन्मयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर २००७ मधील ऑस्ट्रेलियातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो एका गुजराती नाटकाच्या वेळी काढलेला आहे. या फोटोमध्ये जेठालाला, बाबू जी, कोमल भाभी, बाघा असल्याचे दिसत आहे. तसेच हा फोटो शेअर करत त्याने ‘काही आठवणी कायम हृदयाजवळ असतात. दया भाई दोध दया नाटकाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील हा फोटो’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

तन्मयने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये चंपकलालला ओळखणे देखील कठीण झाले आहे. दिलीप जोशी यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तर चंपकलाल यांनी पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can you spot taarak mehta ka ooltah chashmahs champak chacha avb