छोट्या पडद्यावरील ‘कॉमेडी सर्कस’मधून लोकप्रियता मिळालेला कॉमेडियन आणि अभिनेता सिद्धार्थ सागरने सगळ्यांची मने जिंकली आहेत. त्याने कमी वयात यशाचे शिखर गाठले आहे. मात्र, आता सिद्धार्थ सागर विषयी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिद्धार्थला पुन्हा एकदा ड्रग्सचे व्यसन लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतर सिद्धार्थ नशेच्या अवस्थेत पोलिसांना सापडला आणि त्यानंतर त्यांनी त्याच्या आईला फोन करून सिद्धार्थच्या प्रकृतिची माहिती दिली. पोलिसांकडून मुला विषयी कळल्याननंतर सिद्धार्थच्या आईने पुन्हा एकदा त्याला रिहॅब सेंटरला दाखल केले. आता त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सिद्धार्थची आई अलका सागर यांनी मुलाच्या स्थितीबद्दल बोलताना सांगितले की तो बायपोलर डिसऑर्डर विकाराचा शिकार झाला आहे. ‘मला पोलीस स्टेशनवरून फोन आला की सिद्धार्थची प्रकृती खराब आहे आणि त्याला फक्त माझे नाव आणि नंबर आठवत आहे. त्याने मला तिथून घेऊन जाण्यास सांगितले,’ असे सिद्धार्थच्या आईने सांगितले.

आणखी वाचा : सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार, शेहनाजची अवस्था पाहून डोळे पाणावतील

आणखी वाचा : सिद्धार्थ शुक्ला ऐवजी स्वत: च्या मृत्यूचे शोक व्यक्त करणारे ट्वीट पाहून भडकला अभिनेता, म्हणाला…

पुढे त्या म्हणाल्या, ‘हे खूप वाईट आहे की जेव्हा पण अशी काही गोष्ट होते, तेव्हा त्याचे मित्र किंवा त्याचे हितचिंतक त्याच्या मदतीसाठी पुढे येत नाहीत. नेहमी त्याचे आई-वडील त्याच्यासोबत असतात. पण त्याला त्याच्या आई-वडिलांचे महत्त्व कधीच समजले नाही. मी त्याची आई आहे आणि त्याने यातून बाहेर यावे अशीच माझी इच्छा आहे.’ २०१८ मध्ये सिद्धार्थने तो ड्रग्स घेत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सिद्धार्थने एका मुलाखतीत त्याच्या आई-वडिलांवर गंभीर आरोप केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comedy circus fame sidharth sagar admitted to rehab center as again got addicted to drugs dcp