गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी क्रिकेटपटू के एल राहुलला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते सतत एकत्र फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा इंग्लंडमध्ये फिरतानाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत होता. पण त्या दोघांनीही अद्याप उघडपणे यावर वक्तव्य केलेले नाही. आता अथिया आणि के एल राहुलचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. या फोटोमध्ये ते दोघे एकत्र दिसत आहेत,

के एल राहुल सध्या इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. ऑगस्टमध्ये पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. दरम्यान इशांत शर्माच्या पत्नीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये केएल राहुल आणि अथिया शेट्टी एकत्र असल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टीला एका मुलाखतीमध्ये अथिया के एल राहुलसोबत इंग्लंडला गेली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत सुनील म्हणाला होता की, ‘हो अशा चर्चा सुरु आहेत. पण मला यावर काहीच बोलायचे नाही.’

काही कॉमन फ्रेंड्सने देखील अथिया आणि के एल राहुलसोबतचे फोटो शेअर केले होते. फोटो पाहून ते दोघे इंग्लंडमध्ये एकत्र असल्याचे म्हटले जात होते. आता इशांत शर्माच्या पत्नीने फोटो शेअर केल्यानंतर ते दोघे इंग्लंडमध्ये असल्याचे कन्फर्म झाले आहे.