‘त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध…’, अभिनेत्रीने ‘सहकुटुंब सहपरिवार’च्या प्रोडक्शन कंट्रोलरविरोधात केली तक्रार

क्राईम पेट्रोलमधील अभिनेत्री स्वाती भदवेने ही तक्रार केली आहे.

Crime Patrol Actress, Swati Bhadave, Sahkutumb Sahaparivar, Sahkutumb Sahaparivar FIR,

सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेत सूर्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी मालिकेतील निर्माते आणि सहकलाकारांविरोधात तक्रार दाखल केली होती. आता त्यांच्या पाठोपाठ अभिनेत्री स्वाती भदवेने प्रोडक्शन कंट्रोलर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

स्वातीने नुकतीच ई-टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मालिकेत नंदिता पाटकरची बॉडी डबल म्हणून काम केल्याचे सांगितले. ‘प्रोडक्शन कंट्रोलरने माझ्याकडे फोन नंबर मागितला होता. मी पुण्यातून काम करु शकते की नाही असे त्याने मला विचारले. मी हो म्हणत कुठूनही काम करु शकते असे सांगितले. त्यानंतर त्याने मला तुझ्याकडून काही तरी हवे आहे असे सांगितले. मी त्याला कमिशन देईन असे सांगितले. पण त्याने नकार देत म्हटले की मला आणखी काही तरी हवे आहे’ असे स्वाती म्हणाली.
आणखी वाचा : ‘मी २४ तासात एकदाच टॉयलेट…’, अभिजीत बिचुकलेच्या अजब खुलाश्याने राखीला बसला धक्का

पुढे ती म्हणाली, ‘त्याला माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे होते आणि मला ते मान्य नव्हते. जर मी त्याचे म्हणणे ऐकले तर मला आणखी काम देईन असे त्याने सांगितले. हे सर्व माझ्यासाठी धक्कादायक होते.’

या मुलाखतीमध्ये स्वातीने या संदर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे सांगितले आहे. तक्रारीनंतर त्याला अटक देखील झाली. स्वातीने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने फुलाला सुगंध मातीचा, जिजामाता अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने क्राईम पेट्रोल या हिंदी मालिकेतही काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Crime patrol actress swati bhadave files fir against sahkutumb sahaparivars production controller avb

Next Story
Video: गोष्ट पडद्यामागची भाग ५, चित्रपटाची कल्पना २० वर्षांपूर्वीच सुचली अन्…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी