‘मी २४ तासात एकदाच टॉयलेट…’, अभिजीत बिचुकलेच्या अजब खुलाश्याने राखीला बसला धक्का

नुकताच अभिजीत बिचुकलेनी हिंदी बिग बॉस १५मध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री केली आहे.

मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झालेला अभिजीत बिचुकले आता हिंदी बिग बॉस सिझन १५मध्ये दिसत आहे. नुकताच राखी सावंतसोबतच अभिजीत बिचुकलेची घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. घरात अभिजीत बिचुकलेची एण्ट्री होताच प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन होताना दिसत आहे. दरम्यान, अभिजीत बिचुकलेने अजब खुलासा केला आहे.

बिग बॉस १५च्या घरातील वॉशरुम एरियामध्ये राखी सावंत आणि अभिजीत जेवणासंदर्भात गप्पा मारताना दिसतात. राखी अभिजीतला विचारते ‘तुम्ही जास्त का जेवत नाहीत?’ त्यावर अभिजीतने दिलेल्या उत्तराने राखीसोबतच प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे. टॉयलेटला जाणे हे फार कंटाळवाणे काम आहे असे अभिजीत म्हणाला. तसेच २४ तासामध्ये एकदाच टॉयलेटला जातो आणि टॉयलेटला कमी जायला लागावे म्हणून मी कमी जेवतो असा खुलासा अभिजीतने केला आहे.
आणखी वाचा : ‘त्याने संपूर्ण शरीरावर…’, उर्फी जावेदने सांगितले ब्रेकअपचे कारण

अभिजीतचे बोलणे ऐकून राखी पुन्हा विचारते, टॉयलेट जाणे तुम्हाला कंटाळवाणे वाटते? त्यावर अभिजीत हो, मला जेवायलाच नको असे म्हटले आहे. काहींना ते ऐकून धक्का बसला तर काहींना राखी आणि अभिजीतमधील संवाद मजेशीर वाटला आहे.
Video : …अन् सारा अली खानने मागितली फोटोग्राफरची माफी

मंगळवारी पार पडलेल्या एपिसोडमध्ये अभिजीत बिचुकलेची घरात एण्ट्री झाली आहे. तसेच घरात आल्यानंतर त्याच्या जेवणावरुन भांडण देखील झाले आहे. तेजस्वी प्रकाश, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट यांच्यामध्ये अभिजीतच्या जेवणावरुन भांडण होते.

अभिजीत बिचुकले हा ‘बिग बॉस मराठी’मध्ये होता. मराठी बिग बॉसमध्ये जेव्हा सलमानने हजेरी लावली तेव्हा महेश मांजरेकर यांनी अभिजीतविषयी भाईजानला सांगितले होते. त्यांनी सांगितलं की अभिजीतने ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा पूर्ण नकाशा बदलून टाकला होता. अभिजीत हा साताऱ्याचा आहे. अभिजीतने महापालिका ते संसदेपर्यंत निवडणूक लढवली आहे. तो स्वत:ला कलाकार, लेखक, कवी, गायक आणि कंपोजिशन मेकर म्हणवतो. अभिजीतची पत्नी ही सोशल वर्कर आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss abhijeet bichukale said going toilet boring make rakhi sawant laugh avb

ताज्या बातम्या