दीपिका पदुकोणने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये दीपिकाच्या यशस्वी प्रवास हा सोनम कपूरला दुखावणारा ठरला आहे. सोनम कपूर आणि दीपिका या दोघींनी बॉलिवूडमध्ये एकाचवेळी पदार्पण केले होते. २००७ मध्ये दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सावरिया या चित्रपटातून सोनम कपूरने एन्ट्री केली होती. तर शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने आपला बॉलिवूड प्रवास सुरु केला. दोघींनी एकाचवेळी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असताना सोनम आणि दीपिकाच्या यशामध्ये मोठे अंतर असल्याचे सहज दिसून येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

[jwplayer 07Qtp6Si]

दोघींच्या यशामधील अंतर एका पुरस्कार सोहळ्यामध्ये दिसून आले. नुकत्याच पार पडलेल्या बॉलिवूडमधील पुरस्कार सोहळ्यात सोनम कपूरच्या हस्ते प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार होते. सोनम कपूर रेखा यांच्या ‘खूबसूरत’ चित्रपटाच्या सिक्वलमध्ये दिसली होती. त्यामुळे सोनमला रेखांची निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. सोनम कपूरला मिळालेला हा मान अखेरच्या टप्प्यात रद्द करुन दीपिकाला ही संधी देण्यात आली. रेखा यांच्यासाठी ही फार मोठी गोष्ट नसली तरी दीपिकासाठी हा क्षण मानाचा असाच होता. रेखा यांना सन्मानित करण्याची संधी दीपिकाची उंची वाढविणारी अशी आहे.

[jwplayer tADAb9jO]

हॉलिवूडमधून दमदार पदार्पण करण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण आता पूर्णपणे सज्ज झाली आहे. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय आणि प्रभावी भूमिका साकारत आपली छाप उमटवणारी दीपिका ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या तिच्या हॉलिवूडपटातुन हॉलिवूडमधील प्रवास सुरु करणार आहे. बॉलिवूडमधून हॉलिवूडच्या चित्रपटात प्रियांकाला टक्कर देणाऱ्या दीपिकाने आणखी एक मान मिळविला आहे. काहीदिवसांपूर्वी दीपिकाने प्रियांकाला मागे टाकत “सेक्सिएस्ट एशियन वुमन” चा किताब पटकविला होता. आपल्या सौंदर्याची जादू बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये दाखवून देणाऱ्या दीपिकाने पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळविला होता. मागील दोन वर्षापासून या पुरस्कारासाठी प्रियांकाची वर्णी लागत होती. अर्थातच दीपिका सध्या यशाच्या शिखरावर आहे म्हटल्याच चूकीचे ठरणार नाही. दीपिकाच्या तुलनेत यशासाठी संघर्ष करणाऱ्या सोनम कपूरने ‘नीरजा’ या चित्रपटातून नीरजा भनोतची भूमिका साकारत अनेकांची मने जिंकली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone give award to rekha