"आपल्या अभिनयाचा ठसा…" देवेंद्र फडणवीसांनी महेश कोठारेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | deputy cm devendra fadnavis birthday wishes to actor mahesh kothare instagram post nrp 97 | Loksatta

“आपल्या अभिनयाचा ठसा…” देवेंद्र फडणवीसांनी महेश कोठारेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महेश कोठारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“आपल्या अभिनयाचा ठसा…” देवेंद्र फडणवीसांनी महेश कोठारेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक अशी ओळख असलेले अभिनेते म्हणून महेश कोठारे यांना ओळखले जाते. महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील एक काळ चांगलाच गाजवला. एक अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून मराठीमध्ये त्यांनी त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट, झपाटलेला, जिवलगा, पछाडलेला, माझा छकुला असे अनेक चित्रपट त्या काळात सुपरहिट ठरले. अभिनेते महेश कोठारे यांनी काल त्यांचा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महेश कोठारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबद्दल महेश कोठारे यांनी पोस्ट शेअर केली आहे.

महेश कोठारे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक पत्र शेअर केले आहे. याला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे. “माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे माझ्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित झाला. आपण मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद”, असे ते म्हणाले.
आणखी वाचा : ‘झी मराठी अवॉर्ड्स’मध्ये श्रेयस तळपदेला डावललं, सर्वोत्कृष्ट नायक विभागात नामांकन न दिल्याने नेटकरी संतापले

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्रात काय म्हटले?

“श्री महेशजी कोठारे,

जन्मदिनानिमित्त आपले मन:पूर्वक अभिष्टचिंतन!

आपला अभिनय, लेखन आणि निर्मिती क्षेत्रातील कारकीर्द उल्लेखनीय आहे. थरार, हास्य आणि करुणा या तिन्ही प्रकारातील आपल्या अभिनयाचा ठसा आपल्या या क्षेत्रातील कामगिरीत मैलाचा दगड ठरावा असाच आहे. चित्रपट कितीही असतील, पण धुमधडाका, थरथराट, झपाटलेलाने आणलेली स्टाईल करमणुकीचे रेकॉर्ड उच्चांकावर नेणारी आहे. करमणूक क्षेत्रातील नवं तंत्रज्ञान वेळेत आत्मसात करुन चित्रपटनिर्मिती केल्याने आपले चित्रपट विक्रमी ठरले. मराठी चित्रपटांची निर्मिती तसेच दिग्दर्शन व अभिनयाद्वारे प्रेक्षकांना पुन्हा मराठी चित्रपटांकडे आकर्षित केले. मराठी चित्रपटांना व्यावसायिक यश मिळू शकते हे सुद्धा सिद्ध केले.

सिनेमास्को, फोर ट्रँक साऊंड, थ्री डी, कॉम्प्युटर ग्राफिक्स, डॉल्बी, डिजीटलट साऊंड इत्यादीचा वापर करुन मराठी चित्रपटाला नवा आयाम दिला. व्यावसायिकतेच्या या यशस्वी फॉर्म्युल्याने मराठी चित्रपटांची घौडदौड वेगात सुरु झाली. आपल्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीची आणखी सेवा होईल, असा विश्वास आहे. आपणास निरामयी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!”

आणखी वाचा : ‘#घरापासून_दूर तुम्हाला काय वाटतं?’ मराठी सिनेसृष्टीचा आगळावेगळा ट्रेंड; आठवणी सांगताना कलाकार भावूक

दरम्यान महेश कोठारे हे नायक, हुशार दिग्दर्शक आणि दूरदृष्टी असणारा चित्रपट निर्माता म्हणून ओळखले जाते. त्यांनी धुमधडाकापासून अगदी अलीकडच्या झपाटलेला २ पर्यंत अनेक विषयांवर विनोदी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. मराठी चित्रपटामधील ९० च्या दशकाने चित्रपटातील गाजवलं आहे. धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट, झपाटलेला, जिवलगा, पछाडलेला, माझा छकुला यासारखे अनेक चित्रपट सुपरहिट झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अभिनेता वरुण धवनने सुपरस्टार सलमान खानबद्दल केलं मोठं विधान; म्हणाला “त्याने ओटीटीवर…”

संबंधित बातम्या

“हा प्रोपगंडा आणि वल्गर चित्रपट…” IFFI मध्ये मुख्य ज्युरींनीच साधला ‘द काश्मीर फाईल्स’वर निशाणा
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
“एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण
“सतत एकेरी उल्लेख करतोय कारण…” विक्रम गोखलेंच्या निधनानंतर शरद पोंक्षे यांचं ट्वीट चर्चेत
सुपरस्टार चिरंजीवी यांनी चित्रपट महोत्सवात चाहत्यांना दिलं मोठं वचन; म्हणाले “मी चित्रपटसृष्टी…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
राखी सावंतचा बॉयफ्रेंड आदिल निघाला हॉलिवूडला! २०२३ मध्ये येणाऱ्या नव्या सिनेमाची घोषणा, पाहा Video
विश्लेषण: नारळ काढण्यासाठी प्रशिक्षणाची गरज? कोकणातील दुर्लक्षित कल्पवृक्षाबाबत ही समस्या का उद्भवते?
‘या’ ३ सुक्या मेव्याचे सेवन आयुष्य वाढवेल; फक्त दिवसातून किती खाल्ले पाहिजे ते जाणून घ्या
चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल, म्हणाल्या “असे कितीही आडवे आले तरी…”
“कश्मीर पंडितांच्या…” IFFI च्या ज्युरी प्रमुखांनी ‘द कश्मीर फाइल्स’चा ‘व्हल्गर’ उल्लेख केल्यानंतर चित्रपटातील अभिनेता संतप्त