दिग्दर्शक रोहित धवनच्या आगामी ‘ढिशूम’ या अॅक्शनपटाचा फर्स्टलूक प्रदर्शित झाला आहे. ‘ढिशूम’ चित्रपटात बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि जॉन अब्राहिम यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘ढिशूम’च्या फर्स्टलूकमध्ये जॉन आणि वरुण वाळवंटात एका बाईकवरून सुसाट पळताना दिसतात. दोघांचा अॅक्शन पॅक्ट अंदाजाचे दर्शन या पोस्टरमधून घडविण्यात आले आहे. पोस्टर पाहूनच चित्रपटाचा बाज लक्षात येतो.
‘ढिशूम’ चित्रपटाचे चित्रीकरण मोराक्को आणि अबू धाबी येथे करण्यात आले आहे, तर भाऊ रोहित धवनसोबतचा हा वरुणचा पहिलाच चित्रपट असणार आहे. गेल्या चार वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेला अक्षय खन्ना देखील या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. चित्रपटात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, कबीर बेदी आणि राम कपूरचीही भूमिका आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Dec 2015 रोजी प्रकाशित
‘ढिशूम’चा फर्स्टलूक, वरूण आणि जॉन बॉलीवूडचे नवे अॅक्शन स्टार
पोस्टर पाहूनच चित्रपटाचा बाज लक्षात येतो.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 07-12-2015 at 12:17 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhishoom first look varun dhawan john abraham are the new action boys