अलिकडेच राज्यसभेचे सदस्यत्व मिळालेले जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती लवकरच एका नव्या अवतारात टीव्हीवर दिसणार आहेत. एका डान्स रिअॅलिटी शोदरम्यान पहिल्यांदाच ते रॅपर म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ‘डान्स इंडिया डान्स – लिटल मास्टर्स’ झी टीव्हीवरील या प्रसिध्द कार्यक्रमाच्या भव्य अंतिम सोहळ्याच्या भागात मिथुन चक्रवर्ती काही कुल मुव्हज् सादर करताना दिसणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मिथुन चक्रवर्ती झी टिव्हीवरील या कार्यक्रमाशी जोडलेले आहेत. या भागाचे प्रक्षेपण शनिवारी करण्यात येणार आहे.
या ६२ वर्षीय राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याने कार्यक्रमातील स्पर्धक, प्रशिक्षक आणि पंचांची ओळख करून देण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या गाण्याला आपल्या अनोख्या शैलीत गायले, त्याचबरोबर मंचावर नृत्य आणि विनोदाची पेरणी करत उपस्थितांना आश्चर्यचकीत केले. हाताच्या प्रत्येक बोटात आंगठी, गळ्यात पदक असलेली जाड सोन्याची चेन, डोक्यावर ‘एम’ अक्षर कोरलेली टोपी आणि चामड्याचे काळे जॅकेट असा रॅपर सारखा पोषाख परिधान केलेले मिथुन चक्रवर्ती मंचावर उठून दिसत होते.
संग्रहित लेख, दिनांक 24th Mar 2014 रोजी प्रकाशित
डिस्को किंग मिथुन चक्रवर्ती झाले रॅपर
अलिकडेच राज्यसभेचे सदस्यत्व मिळालेले जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती लवकरच एका नव्या अवतारात टीव्हीवर दिसणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 24-03-2014 at 05:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disco king mithun chakraborty turns rapper