‘बिग बॉस ओटीटी’च्या विजेतेपदावर अखेर दिव्या अग्रवालने आपलं नाव कोरलं आहे. दिव्या ‘बिग बॉस ओटीटी’ची विजेती ठरली आहे. या शोमध्ये विजेतेपद पटकावत दिव्याने ट्रॉफीसह २५ लाख रुपये रक्कम जिंकली आहे. तर या शोमध्ये निशांत भट्ट रनरअप ठरला असून शमिता शेट्टी तिसऱ्या स्थानावर राहिली. दिव्याने ‘बिग बॉस ओटीटी’च्या विजेतेपदावर नाव कोरलं असलं तरी ‘बिग बॉस १५’च्या घरात मात्र तिला एण्ट्री मिळणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोच्या पहिल्या दिवसापासूनच दिव्या अग्रवाल चांगलीच चर्चेत होती. शिमिता शेट्टी आणि दिव्या मधील वाद चांगलाच चर्चेत आला होता. अभिनेत्री गौहर खानने सोशल मीडियावरून दिव्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर या शोमध्ये कायम चर्चेत असलेल्या शिमिता शेट्टीला आणि निशांत भट्टला ‘बिग बॉस १५’साठी थेट तिकिट मिळालं आहे.

हे देखील वाचा: ‘बिग बॉस १५’साठी सलमान खानची फी माहितेय का?, मानधन ऐकून डोळे चक्रावतील

हे देखील वाचा: “तुम्हाला थोडी देखील अक्कल नाही का?”; ‘त्या’ प्रश्नावर समांथा भडकली

शनिवारी ‘बिग बॉस ओटीटी’चा फिनाले पार पडला. यावेळी रितेश देशमुख आणि जिनेलियाने खास हजेरी लावली होती. यावेळी स्पर्धकांचे खास परफॉर्मन्सेसही पाहायला मिळाले. पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘बिग बॉस’चा हा सिझन पार पडला होता. करण जोहरने हा संपूर्ण सिझन होस्ट केला.

दिव्या अग्रवाल एक अभिनेत्री आणि मॉडेल असून ती एक डान्सरदेखील आहे. दिव्याने कोरिओग्राफर टेरंन्स लुईसच्या डान्स अकेडमीमधून डान्सचं प्रशिक्षण घेतलंय. यानंतर दिव्याने स्वत:ची डान्स अकेडमी सुरु केली. दिव्याने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना कोरिओग्राफ केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divya agarwal wins big boss ott trophy nishant bhat and shamita shetty emerging as first and second runners up respectively kpw