‘मल्टिलेव्हल मार्केटिंग’ क्षेत्रातील ‘क्यूनेट’ कंपनीकडून झालेल्या ४२५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अभिनेता बोमन इराणीचा मुलगा दानेश याचा काय संबंध आहे, हे पडताळून पाहणाऱ्या मुंबई पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने (इओडब्ल्यू) दानेशचे बॅंक खाते गोठवले आहे.
या महिन्याच्या सुरूवातीला ‘इओडब्ल्यू’ने गुरप्रित आनंदच्या ‘क्यूनेट’ संदर्भातील तक्रारीवरून दानेशविरुध्द तपास सुरू केला. सोमवारी ‘इओडब्ल्यू’ने दानेशचे प्रायव्हेट बॅंकेतील खाते गोठवले. ‘इओडब्ल्यू’च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार २८ आणि ३० लाख रुपयांच्या दोन मुदत ठेवी असलेले दानेशचे बॅंक खाते गोठविण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला असता दानेशला ‘क्यूनेट’कडून ४० लाख रूपये मिळाल्याचे देखील या अधिकाऱ्यांकडून समजले. हे पैसे कशाच्या मोबदल्यात मिळाले याची पोलिस खातरजमा करून घेत आहेत. लवकरच दानेशला समन्स बजावण्यात येणार आहे. पोलिस चौकशीसाठी हजर होताच ‘क्यूनेट’मधील त्याची भूमिका आणि कशाच्या मोबदल्यात त्याला हा पैसा मिळाला हे पोलिस जाणून घेणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jan 2014 रोजी प्रकाशित
‘इओडब्ल्यू’ने बोमन इराणीच्या मुलाचे बॅंक खाते गोठवले
'मल्टिलेव्हल मार्केटिंग' क्षेत्रातील 'क्यूनेट' कंपनीकडून झालेल्या ४२५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अभिनेता बोमन इराणीचा मुलगा दानेश याचा काय संबंध आहे, हे पडताळून पाहणाऱ्या मुंबई पोलीसांच्या गुन्हे...

First published on: 14-01-2014 at 02:42 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eow freezes account of boman iranis son