बॉलिवूड अभिनेत्री आणि ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखीने केलेल्या प्रत्येक विधानानंतर तिला अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागतो. इतकंच नाही तर अनेक वेळा तिला सोशल मीडियावर ट्रोलदेखील व्हावं लागलं आहे. दरवेळेप्रमाणे आताही राखीवर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. राखी सावंतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राखी सावंत पाकिस्तानी झेंड्यासह दिसत आहे. नेटकऱ्यांनी राखीला यावरुन ट्रोल केले आहे. मात्र राखीने याचं आपल्या खास शैलीत उत्तरही दिलं आहे.

राखी सावंतचे पाकिस्तानी झेंड्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो शेअर करत एका नेटकऱ्यांनी लिहलेय की, ‘हे आहे राखी सावंतचे सत्य. एकीकडे भारतीय असल्याचा गर्व करते अन् दुसरीकडे पाकिस्तानी झेंड्यासोबत फोटो पोस्ट करत आहे.’ दुसऱ्या एका नेटकऱ्यांने असं लिहलेय की, ‘राखी सावंत देशाबरोबर गद्दारी करत आहे. या देशद्रोहीला पाकिस्तानात पाठवून द्या.’


नेमकं काय आहे सत्य –
पाकिस्तानी झेंड्याबरोबर व्हायरल होणारे राखी सावंतचे फोटो २०१९ मधील आहे. मे २०१९ मध्ये राखीने स्वत: हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. ‘कलम ३७०’ या चित्रपटात राखी सावंतने एका पाकिस्तानी मुलीची भूमिका केली होती. तोच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. २०१९ मध्ये पाकिस्तानी झेंड्यासोबत फोटो पोस्ट करत राखीने लिहले होते की, ‘भारतावर माझं खूप प्रेम आहे. पण कलम ३७० या चित्रपटात मी एका पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारत आहे.’ राखी सावंतने त्यावेळी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे.

राखी सावंतने या प्रकरणाचं स्पष्टीकरण देताना इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यामध्ये राखीनं कंगनावरही निशाना साधला आहे.


या व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणते की, जर तिला मुंबई पीओकेसारखी वाटते तर ती इथे काम करण्यासाठी आलीच का? ‘आज जे कंगनाला पाठिंबा देत आहेत त्यांना लवकरच खरं काय ते कळेल. तिला मदत करणाऱ्या सहकाऱ्यांना तिने सोडलं नाही. तर ती राजकीय पक्षाला तरी कश काय सोडेल. तिला पार्टीत घ्या तरी.. तिला तिकीटावर उभं करा तरी.. सगळ्यांची पोल खोलेल. कोणालाही सोडणार नाही.. फक्त तुम्ही पाहत रहा’