चित्रपटात प्रशांत दामले, जयमाला शिलेदार, अमिता खोपकर, आनंद अभ्यंकर इत्यादींच्याही भूमिका होत्या. सुधीर जोशी व रमेश भाटकर पाहुणे कलाकार होते. हरिष जोशी छाया दिग्दर्शक होते. स्मिता तांत्रिक पातळीवर देखिल विशेष रस घेई. या चित्रपटाची जास्त भिस्त संवाद व अभिनय यावर होती. आणि त्यात चित्रपटाने छानच बाजी मारून समिक्षक व प्रेक्षक या दोघांचीही दाद मिळवली. त्यानंतर काही वर्षांतच आलेल्या राज कंवर दिग्दर्शित ‘जुदाई’ची मध्यवर्ती कथासूत्र या चित्रपटावरून तर सुचले नाही ना अशी चर्चा होणे ‘सवत’चे यश होते. खोट्या श्रीमंतीच्या आनंदासाठी त्यात पत्नी (श्रीदेवी) आपल्याच पतीचे (अनिल कपूर) लग्न एका श्रीमंत युवतीशी ( उर्मिला मातोंडकर) लावून देते अशी कल्पना होती. सवत माझी लाडकीला राज्य शासनाकडून त्यावर्षी चौदापैकी पाच पुरस्कार मिळाले. त्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट तृतीय क्रमांक व दिग्दर्शन या दोन पुरस्कारासह नीना कुलकर्णी व प्रशांत दामले यांना अभिनयाचा तर विश्वास दाभोळकर व अनिल कावले यांना संकलनाचा पुरस्कार प्राप्त झाला.
दिलीप ठाकूर
संग्रहित लेख, दिनांक 1st Sep 2017 रोजी प्रकाशित
फ्लॅशबॅक : ‘सवत माझी लाडकी’चा खुमासदारपणा
वेगळा आशय व मनोरंजन यांचा योग्य तो समतोल हे स्मिताच्नेया चित्रपटांचे वैशिष्ट्य.
Written by लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-09-2017 at 01:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Falshback by dilip thakur marathi movie savat mazi ladki